अमित सावल मृत्यू प्रकरणाचा तपास सायबर सेलकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 12:35 PM2019-10-04T12:35:11+5:302019-10-04T12:35:28+5:30
शवविच्छेदन अहवालानंतर पोलीस तपासाची दिशा निश्चित करण्यात येणार आहे.
अकोला: प्रसिद्ध औषधी विक्रेते जयप्रकाश सावल यांचा मुलगा अमित सावल मृत्यू प्रकरणाचा तपास आता सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांची चौकशी केली असून, शवविच्छेदन अहवालानंतर पोलीस तपासाची दिशा निश्चित करण्यात येणार आहे.
येथील प्रसिद्ध औषधी विक्रेते जयप्रकाश सावल यांचा मुलगा अमित सावल २३ सप्टेंबरच्या संध्याकाळी ६.३० वाजतापासून बेपत्ता होता. त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी सकाळी अमितचा मृतदेह महान धरणात सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर पोलिसांनी अमितच्या काही मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी संशयितांची चौकशी सुरू केली असून, उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर तपासाची दिशा स्पष्ट होणार आहे. यामध्ये पोलिसांनी तपासाची गती वाढवून काहींची बयाने नोंदविली आहेत. या प्रकरणाचा तपास आता सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून, सायबर पोलिसांनी एकंदरीत घटनेचा आढावा घेतला असून, उत्तरीय तपासणीचा अहवालाची प्रतीक्षा असल्याची माहिती दिली. (प्रतिनिधी)
अमित सावल यांच्या दोन्ही मोबाइल क्रमांकाचा डाटा काढण्यात येणार आहे. त्यानंतर या प्रकरणात ज्यांचा कुणाचा संंबंध असेल त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीनंतरच तपासाची पुढील दिशा ठरणार आहे.
- शैलेश शेळके, पोलीस निरीक्षक, सायबर विभाग पोलीस ठाणे.