सायकल, शिलाई मशीन वाटप योजनेचा निधी वितरीत करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 03:12 PM2018-07-07T15:12:53+5:302018-07-07T15:14:49+5:30

अकोला : महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या सायकल व शिलाई मशीन वाटप योजनेचा निधी जिल्ह्यातील पंचायत समिती स्तरावर वितरीत करण्याचा ठराव जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आला.

 Cycle, sewing machine distribution scheme! | सायकल, शिलाई मशीन वाटप योजनेचा निधी वितरीत करणार!

सायकल, शिलाई मशीन वाटप योजनेचा निधी वितरीत करणार!

Next
ठळक मुद्देसायकल व शिलाई मशीन वाटप योजनेंतर्गत लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी विभागामार्फत तयार करण्यात आला. महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाºया योजनांच्या मुद्दयावर या सभेत चर्चा करण्यात आली.महिला व बालकल्याण सभापती देवका पातोंड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला समितीचे सदस्य आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अकोला : महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या सायकल व शिलाई मशीन वाटप योजनेचा निधी जिल्ह्यातील पंचायत समिती स्तरावर वितरीत करण्याचा ठराव जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आला.
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सायकल व शिलाई मशीन वाटप योजनेंतर्गत लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यासाठी विभागामार्फत तयार करण्यात आला असून, या अर्जाच्या प्रारुप नमुन्यास या सभेत मान्यता देण्यात आली. महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाºया योजनांच्या मुद्दयावर या सभेत चर्चा करण्यात आली. महिला व बालकल्याण सभापती देवका पातोंड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला समितीचे सदस्य आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वंचित लाभार्थ्यांना सायकल वाटप करणार !
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत सन २०१७-१९ या वर्षात राबविण्यात आलेल्या सायकल वाटप योजनेंतर्गत जिल्ह्यातील ज्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही, अशा वंचित लाभार्थ्यांना सायकल वाटप योजनेचा लाभ देण्याचेही समितीच्या सभेत ठरविण्यात आले.

 

Web Title:  Cycle, sewing machine distribution scheme!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.