‘डब्बाकिंग’ची पोलीस कोठडी वाढली!

By admin | Published: September 27, 2016 02:52 AM2016-09-27T02:52:21+5:302016-09-27T02:52:21+5:30

विशेष न्यायालयासमोर हजर केले असता, आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ केली.

Dabbakin police custody extended! | ‘डब्बाकिंग’ची पोलीस कोठडी वाढली!

‘डब्बाकिंग’ची पोलीस कोठडी वाढली!

Next

अकोला, दि. २६- आकोटातील लोहारी रोडवरच्या आलिशान बंगल्यामधून ह्यकस्तुरी कमोडिटीजह्णच्या नावाखाली चालविण्यात येत असलेल्या समांतर शेअर मार्केट (डब्बा ट्रेडिंग)चा सूत्रधार दिनेश लक्ष्मीनारायण भुतडा याची पोलीस कोठडी संपल्याने, त्याला सोमवारी आकोट येथील विशेष न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांनी वाढ केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाने १ जून रोजी आकोट येथे छापा मारून डब्बा ट्रेडिंगचे ह्यसौदाह्ण नावाचे सॉफ्टवेअर जप्त केले होते. येथून सात आरोपींना अटक करण्यात आली होती. यामध्ये दिनेश भुतडा फरार झाला होता. त्याने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाने त्याला दिलासा न देता पोलिसांसमोर शरण येण्याचा आदेश दिला; मात्र दिनेश भुतडाने नागपूर खंडपीठात धाव घेतली. नागपूर खंडपीठाने भुतडाला २0 सप्टेंबरपर्यंंत पोलिसांसमोर शरण येण्याचा आदेश दिला. त्यामुळे दिनेश भुतडाला पोलिसांना शरण जाण्याशिवाय पर्याय नसल्याने भुतडा बुधवारी बाळापूर पोलिसांना शरण आला. त्यानंतर न्यायालयाने आरोपीस २६ सप्टेंबरपर्यंंंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामध्ये दोन दिवसांची आणखी वाढ झाली आहे.

Web Title: Dabbakin police custody extended!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.