दरोड्याच्या प्रयत्नातील दरोडेखोर सीसी कॅमे-यात कैद !

By admin | Published: January 30, 2017 03:23 AM2017-01-30T03:23:42+5:302017-01-30T03:23:42+5:30

शेगावात दरोडेखोरांचा धुमाकुळ सुरुच

Dacoit's attempted robber captured in CC camera! | दरोड्याच्या प्रयत्नातील दरोडेखोर सीसी कॅमे-यात कैद !

दरोड्याच्या प्रयत्नातील दरोडेखोर सीसी कॅमे-यात कैद !

Next

शेगाव, दि. २९- शेगाव शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ सुरूच असून, रविवारी पहाटे स्थानिक सदगुरू नगरात दरोड्याच्या प्रयत्नात असलेले ७ दरोडेखोर सीसी कॅमेर्‍यात कैद झाले आहे.
शेगाव शहरातील जगदंबा नगर भागात राहणार्‍या डॉ.काळमेघ यांच्या निवासस्थानावर महिनाभरापूर्वी सशस्त्र दरोडा पडला होता. या घटनेत दरोडेखोरांनी एका महिलेसह दोघांना जबर मारहाण केली होती. तसेच लाखो रूपयांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेनंतर शहरातील व्यंकटेश नगर, ताडी परिसरासह अन्य भागात रात्रीच्या वेळेस चोर फिरत असल्याच्या तक्रारी शहर पोलीस स्टेशनला करण्यात आलेल्या आहेत. मात्र याची दखल अद्याप पोलिसांनी घेतली नाही. मागील दरोड्यांचा तपास अद्याप लागलेला नसताना रविवारी पहाटे पुन्हा सदगुरू नगरातील एका घरात दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सात दरोडेखोर सुनिल चावरे नामक इसमाच्या घरासमोर लावलेल्या कॅमेरामध्ये दरोडेखोर कैद झाले.
रात्री २.३0 वा.सुमारास चावके यांना जाग आली असता अचानकपणे त्यांना सीसीटीव्हीच्या मॉनिटरमध्ये घरासमोरील गल्लीमधील घरात ७ अज्ञात चोरटे घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच घरासमोरील लाइट सुरु करून आरडाओरड केली. त्यानंतर लगेच याबाबतची माहिती शहर पोलीस स्टेशनला दुरध्वनीवरून दिली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार यशवंत बाविस्कर यांनी घटनास्थळी पोहचून घटनेची माहिती घेतली. मात्र, तोपयर्ंत दरोडेखोर पसार झाले होते. वारंवार होत असलेल्या घटनांमुळे शहरात पोलीसाची गस्त काटेकोरपणे व्हावी अशी मागणी यावेळी नागरीक करीत आहेत.

Web Title: Dacoit's attempted robber captured in CC camera!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.