बाबाे! कापशी तलावाची २०० एकर जागा गावकऱ्यांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:23 AM2021-09-04T04:23:55+5:302021-09-04T04:23:55+5:30

ब्रिटिश राजवटीत शहरवासीयांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी सुमारे ७०० एकर जागेत कापशी तलावाची निर्मिती करण्यात आली हाेती. या तलावातून शहरापर्यंत ...

Dad! 200 acres of Kapashi Lake in the throat of the villagers | बाबाे! कापशी तलावाची २०० एकर जागा गावकऱ्यांच्या घशात

बाबाे! कापशी तलावाची २०० एकर जागा गावकऱ्यांच्या घशात

Next

ब्रिटिश राजवटीत शहरवासीयांना पाणीपुरवठा व्हावा, यासाठी सुमारे ७०० एकर जागेत कापशी तलावाची निर्मिती करण्यात आली हाेती. या तलावातून शहरापर्यंत बिडाच्या पाइपलाइनद्वारे पाणी आणल्यावर नेहरु पार्क येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जात हाेती. कालांतराने शहराची भविष्यातील लाेकसंख्या विचारात घेता काटेपूर्णा प्रकल्पात जलसाठा आरक्षित करण्यात आला. त्यामुळे कापशी तलावाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष हाेऊन पाण्याचा उपसा बंद झाला. २००६ मध्ये तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर राेकडे यांनी कापशी ते अकाेला शहरापर्यंतची बिडाची जलवाहिनी काढून घेत या तलावातून हाेणारा संभाव्य पाणीपुरवठा कायमचा बंद केला. त्यानंतर या प्रकल्पाकडे प्रशासनाने पाठ फिरवली.

डाॅ.रणजित पाटील यांच्याकडून निधी

शहरवासीयांसाठी निसर्गरम्य पर्यटनस्थळाची निर्मिती करण्याच्या उद्देशातून तत्कालीन नगर विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील यांनी मनपा प्रशासनाला सुमारे ३ काेटींचा निधी उपलब्ध करुन दिला हाेता. या निधीतून मनपाने रस्ता व इतर कामे प्रस्तावित केली हाेती. ही कामे पूर्ण झाल्यावर प्रशासनाने दुर्लक्ष केले.

२०० एकर जमिनीवर लागवड

कापशी तलाव ७०० एकर जागेत असून त्यापैकी तब्बल २०० एकर जमिनीवर स्थानिक रहिवाशांनी अतिक्रमण केले आहे. जमिनीवर साेयाबीन, मूग, उडिद,कपाशी पिकाची लागवड करण्यात आली आहे. मनपाने ७२ जणांना सात दिवसांची नाेटीस दिली असली तरी शेतातील पिके पाहता अतिक्रमणधारक जमिनीवरचा ताबा कसा साेडतील, याकडे लक्ष लागले आहे.

मनपाच्या मालकीच्या जमिनीवर उभारण्यात आलेले अतिक्रमण निश्चितच हटविल्या जाईल. याठिकाणी चांगल्या दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित केल्यास कापशी गावाची भरभराट हाेइल,यात दुमत नाही. तसेच निसर्गप्रेमी,लहान मुले, नागरिकांना पर्याय उपलब्ध हाेइल.

- निमा अराेरा, जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त

Web Title: Dad! 200 acres of Kapashi Lake in the throat of the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.