लाेखंड चाेरीतील दाेन आराेपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:23 AM2021-07-07T04:23:19+5:302021-07-07T04:23:19+5:30
अकाेला : एमआयडीसी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवणी परिसरातील कपिलवस्तू नगरमधून लाेखंड चाेरणाऱ्या दाेन चाेरट्यांना एमआयडीसी पाेलिसांनी रविवारी अटक केली. ...
अकाेला : एमआयडीसी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवणी परिसरातील कपिलवस्तू नगरमधून लाेखंड चाेरणाऱ्या दाेन चाेरट्यांना एमआयडीसी पाेलिसांनी रविवारी अटक केली. त्यांच्याकडून लाेखंड जप्त करण्यात आले आहे.
कपिलवस्तू नगर येथील रहिवासी नितीन श्रीकृष्ण वानखडे यांच्या घराचे बांधकाम सुरू असून, त्यांनी बांधकामासाठी आणलेले लाेखंड अज्ञात चाेरट्यांनी चाेरून नेले हाेते. या प्रकरणाची तक्रार त्यांनी एमआयडीसी पाेलीस ठाण्यात दिल्यानंतर पाेलिसांनी गुन्हा दाखल करून चाेरट्यांचा शाेध सुरू केला. त्यानंतर मिळालेल्या माहितीवरून शिवणी परिसरातील कपिलवस्तू नगर येथीलच रहिवासी सुरज साहेबराव वानखडे आणि शांतीनगर येथील रहिवासी भीमराव अजाबराव वाहूरवाघ यांनी चाेरी केल्याचे समाेर आले. यावरून पाेलिसांनी दाेन्ही चाेरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चाेरलेले लाेखंड जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त् पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसीचे ठाणेदार किशाेर वानखेडे, दयाराम राठाेड, नीलेश भाेजने व संताेष डाबेराव यांनी केली.