ऑटाे चाेरीतील दाेन चाेरटे गजाआड; सिटी काेतवाली पाेलिसांची कारवाई, ऑटाेसह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

By सचिन राऊत | Published: January 8, 2024 07:02 PM2024-01-08T19:02:02+5:302024-01-08T19:03:28+5:30

या चाेरट्यांकडून चाेरीतील ऑटाेसह दिड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Daen Cherte Gajaad in Otae Cheri Action of City Police, seizure of goods worth one and a half lakhs including cars | ऑटाे चाेरीतील दाेन चाेरटे गजाआड; सिटी काेतवाली पाेलिसांची कारवाई, ऑटाेसह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

ऑटाे चाेरीतील दाेन चाेरटे गजाआड; सिटी काेतवाली पाेलिसांची कारवाई, ऑटाेसह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

अकाेला: सिटी काेतवाली पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील फतेह चाैक परिसरातून एक ऑटाे अज्ञात चाेरटयांनी ५ जानेवारी राेजी चाेरी केल्यानंतर सिटी काेतवाली पाेलिसांनी या चाेरी प्रकरणातील दाेन चाेरटयांना अटक केली. या चाेरट्यांकडून चाेरीतील ऑटाेसह दिड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बैदपूरा येथील रहीवासी कलीम खान रहीम खान वय ३५ वर्ष यांनी सिटी काेतवाली पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा एम एच ३० बीसी १७७६ क्रमांकाचा आटाे घराजवळ उभा केला असता हा ऑटाे अज्ञात चाेरटयांनी पळिवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावरुन त्यांनी सिटी काेतवाली पाेलिस ठाण्यात तक्रार दिली.

यावरुन पाेलिसांनी चाेरीचा गुन्हा दाखल करून आराेपींचा शाेध सुरु केला असता संशयावरुन देवीदास प्रल्हाद रसाळ वय ५४ वर्ष रा. उंद्री जिल्हा बूलढाणा हमू. शंकर नगर आकाेट फैल व सचिन कैलास सावळे वय ३५ रा. आकाेट फैल या दाेघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चाैकशी केली असता दाेन्ही चाेरटयांनी चाेरीची कबूली दिली. त्यानंतर या चाेरटयांकडून ऑटाेसह दिड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पाेलिस अधीक्षक बच्चन सिंग, अपर पाेलिस अधीक्षक अभय डाेंगरे, उपविभागीय पाेलिस अधिकारी सुभाष दुधगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी काेतवालीचे ठाणेदार सुनील वायदंडे, एजाज खान, प्रमाेद अटाळकर, अमीत दुबे, शेख ख्वाजा, निलेश बुंदे, अमाेल दाळू, नदीम शेख यांनी केली.

Web Title: Daen Cherte Gajaad in Otae Cheri Action of City Police, seizure of goods worth one and a half lakhs including cars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.