धरणे, तलाव परिसरात जमावबंदी आदेश लागू करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:23 AM2021-09-17T04:23:28+5:302021-09-17T04:23:28+5:30
जिल्ह्यातील दगडपारवा धरणात ९४.१%, काटेपूर्णा धरणात ९८.५८%, निर्गुणा १००%, वान ९१.८५%, पोपटखेड ९२.६% आणि मोर्ना ८६.६०% असा जलसाठा जमा ...
जिल्ह्यातील दगडपारवा धरणात ९४.१%, काटेपूर्णा धरणात ९८.५८%, निर्गुणा १००%, वान ९१.८५%, पोपटखेड ९२.६% आणि मोर्ना ८६.६०% असा जलसाठा जमा आहे. नदी आणि नालेदेखील प्रवाही असून अकोला जिल्ह्यात १५ ते २० सप्टेंबर ह्या कालावधीत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मागच्या महिन्यात धरण, तलाव परिसरात पुराच्या काळात मोठ्या प्रमाणात शेती आणि घरांचे नुकसान झाले होते. सोबतच जीवितहानी देखील झाली आहे. त्यावरील उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाने तातडीने धरण आणि तलाव परिसरात तत्काळ जमावबंदी लागू करावी. जेणेकरून संभाव्य जीवितहानी टाळता येऊ शकते. जमावबंदी आदेश देण्याबरोबरच पोलीस आणि महसूल यंत्रणा आणि पाटबंधारे विभागालादेखील ह्या परिसरात जमाव गोळा होणार नाही यावर जबाबदारी देण्याची अपेक्षादेखील राजेंद्र पातोडे ह्यांनी व्यक्त केली आहे. यापुढे धरण किंवा तलाव परिसरात एकादा अपघात किंवा मृत्यू झाल्यास त्याला जिल्हा प्रशासन जबाबदार असेल असा इशाराही वंचितने दिला आहे.