अकोला तालुक्यात ६३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:19 AM2021-05-20T04:19:44+5:302021-05-20T04:19:44+5:30
अकोला : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या तडाख्यात बुधवारी जिल्ह्यातील अकोला तालुक्यात ६३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल ...
अकोला : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या तडाख्यात बुधवारी जिल्ह्यातील अकोला तालुक्यात ६३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला.
जिल्ह्यातील विविध भागात बुधवार, १८ मे रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस बरसला. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांसह घरांचे नुकसान झाले. तहसीलदारांकडून प्राप्त अहवालानुसार अकोला तालुक्यात ६३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये लिंबू, मोसंबी, पेरू व पपई इत्यादी पिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे नुकसानाचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला.
दोन तालुक्यांत २७ घरांची पडझड!
वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील अकोला तालुक्यात १४ गावांत २५ घरांचे आणि अकोट तालुक्यात २ घरांचे अंशतः नुकसान झाले. दोन तालुक्यात २७ घरांचे नुकसान झाल्याचेही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.