मूर्तिजापूर तालुक्यातील पाच हजार हेक्टरवरील कपाशीचे नुकसान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 07:31 PM2017-11-26T19:31:12+5:302017-11-26T19:36:41+5:30
मूर्तिजापूर तालुक्यातील पाच हजार हेक्टरवरील कपाशी पिक बोंडअळीने प्रभावीत झाले आहे. उडीद, मूंग, सोयाबीन पिकतर हातातुन गेलेच शिवाय पांढर्या सोन्यालाही लालबोंड अळीने भुईसपाट केल्याने शेतकरी हतबल झाला असल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात पहावयास मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : तालुक्यातील शेतकरी लाल बोंडअळीमुळे पूर्ता त्रस्त झालेला आहे. शेतीला लावलेला खर्चही हाती न मिळाल्यामुळे शेतातील हजारो एकरवरील कपाशीच्या पिकांवर रोडावेटर फिरुन कपाशीचे पिक शेतातून हद्द पार केलेले आहे. तालुक्यातील पाच हजार हेक्टरवरील कपाशी पिक बोंडअळीने प्रभावीत झाले आहे. उडीद, मूंग, सोयाबीन पिकतर हातातुन गेलेच शिवाय पांढर्या सोन्यालाही लालबोंड अळीने भुईसपाट केल्याने शेतकरी हतबल झाला असल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात पहावयास मिळत आहे.
मुर्तिजापूर तालुक्यातील बहुतांश ग्रामीण भागातील शेतकर्यांनी यंदा मोठय़ा प्रमाणात कपाशीचा पेरा केला. चालु हंगामी वर्षात अत्यअल्प प्रमाणात पाऊस पडला. मात्र, ज्या शेतकर्यांकडे मुबलक पाण्याची सोय आहे, अशांनी पिकाला पाणी देवून पिक उभे केले. कपाशीच्या एका झाडाला जवळ जवळ ३0 ते ३५ बोंड लागली. पण कापूस काही फुटत नसल्याने शेतकर्यामध्ये शंकेची पाल चुकचुकली. प्रत्येक शेतकर्यांनी आपआपल्या शेतातील कपाशीच्या बोंडाची पाहणी केली असता त्यामध्ये कापूस तर सोडाच सर्वत्र लालबोंड अळीच दिसुन आली. बिटी कंपनीने कपाशीचे बोगस बियाणे देवून शेतकर्यांची चक्क फसवणूक केली असल्याचे प्रत्यक्षदश्री पहावयास मिळाले.
सिरसो, जांभा खु., शेलूं बोंडे आदी भागातील नागरिक शेतकर्यांनी पैशाची जुळवाजुळव करुन कपाशीचे पिक उभे केले. पूर्वीच उडीद, मूग, सोयाबीन िपकांचे झालेल्या अत्यल्प उत्पादनामुळे नुकसानीमुळे खर्चही न निघाल्याने ह तबल झालेल्या शेतकर्यांवर बोंडअळीमूळे आस्मानी संकट कोसळले. राज्य शासनाने झालेल्या नुकसानाची पाहणी करुन नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शेतकर्यांनी जिवाचा आटापिटा केला. मात्र, त्यांना आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. निवडणूकीपूर्वी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी शेतकर्यांना हमीभाव आणि पिकाला भाव मिळवून देण्याची हमी दिली हो ती. त्यालाही तिन वर्ष उलटली तरीही शेतकरी व आम जनतेचे ‘अच्छे दिन’ आलेच नाही. बीटी कपाशीच्या बोगस बियाण्याची चौकशी करुन शासनाने कनपनी विरोधात दंडात्मक कार्यवाही करण्याची मागणी मुर्तिजापूर तालुक्या तील शेतकर्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी राज्यमंत्री पांडूरंग फुंडकर यांच्याकडे एक निवेदन देवून केली आहे.
-