अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:18 AM2021-03-21T04:18:08+5:302021-03-21T04:18:08+5:30
वाडेगाव : परिसरात शनिवारी झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शुक्रवार, ...
वाडेगाव : परिसरात शनिवारी झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शुक्रवार, १९ मार्च रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास वाडेगाव परीसरात तामसी, चिंचोली, देगाव, नकाशी, बेलुरा, तांदळी, धनेगाव, हिंगणा, दिग्रस बु, खुर्द, तुलंगा, सस्ती आदी गावात जोरदार अवकाळी पावससह हरभऱ्याएवढ्या गारा पडल्या. यामध्ये उशिरा पेरणी केलेल्या गहू, हरभरा, लिंबू तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात लागवड केलेल्या कांदा पिकाचे नुकसान झाले. तसेच मेघगर्जनेसह सुसाट वेगाच्या वाऱ्यामुळे आंब्याची पडझड होऊन लिंबू पिकाचेसुध्दा नुकसान झाले.
---------
खरीप हंगामातील परतीच्या पावसामुळे पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे सुध्दा नुकसान झाले. उन्हाळी पीक टरबूज, काकडी पिकांचे शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले.
अनिरुद्ध घाटोळ, टरबूज उत्पादक युवा शेतकरी