क्रीडा क्षेत्राचेही नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:19 AM2020-12-31T04:19:16+5:302020-12-31T04:19:16+5:30

------------------------ स्पर्धा झाल्याच नाहीत ! दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात क्रीडा स्पर्धा व शिबिरांना सुरुवात होत असते. हे महिने खेळाडूंसाठी ...

Damage to the sports field as well | क्रीडा क्षेत्राचेही नुकसान

क्रीडा क्षेत्राचेही नुकसान

Next

------------------------

स्पर्धा झाल्याच नाहीत !

दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात क्रीडा स्पर्धा व शिबिरांना सुरुवात होत असते. हे महिने खेळाडूंसाठी जणू पर्वणी ठरतात. या स्पर्धांमध्ये विद्यार्थी आपले कर्तृत्व दाखविण्यासाठी तयार असतात; मात्र मार्च महिन्यात कोरोनाने ‘एन्ट्री’ केल्याने स्पर्धा बंद करण्यात आल्या. यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने शाळा बंद करण्यात आल्या, त्याचबरोबर शालेय स्पर्धांनी पूर्णविराम बसला.

---------------

‘आपीएल’मध्ये पुन्हा बोलबाला !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘आयपीएल’ स्पर्धा यूएईमध्ये झाली. या स्पर्धेत पुन्हा अकोल्यातील क्रिकेट क्लब व विदर्भ क्रिकेट संघटनेच्या खेळांडूचा बोलबाला असल्याचे दिसून आले. या स्पर्धेसाठी मध्यमगती गोलंदाज व आक्रमक फलंदाज दर्शन नळकांडे व मध्यमगती गोलंदाज आदित्य ठाकरे यांची निवड झाली. दर्शन याची दुसऱ्यांच्या किग्स एलेवन पंजाब संघात व आदित्यची ‘आरसीबी’ संघाकडून नेट बॉलर म्हणून निवड करण्यात आली होती.

---------------------------

फुटबॉल क्षेत्राला धक्का !

अकोला जिल्ह्यातील फुटबाॅल क्षेत्राला यंदा दोन धक्के बसले असून, फुटबॉलसाठी संपूर्ण आयुष्य वेचणारे दोन तारे निखळले. माजी राष्ट्रीय फुटबॉल व हॉकीपटू दिलीपसिंह बिसेन व ज्येष्ठ फुटबॉलपटू वली मोहम्मद यांचे निधन झाले. या दोघांनी अकोला फुटबॉलला एका वेगळ्या उंचीवर पोहोचविले होते. त्यांनी फुटबॉलच्या प्रसार व प्रचारासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केले होते.

-------------------------------------

कॅरम, बुद्धिबळ आदी स्पर्धा झाल्या ऑनलाइन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे मैदाने ओस पडली होती; मात्र यावर पर्याय शोधत अनेक स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये कॅरम जगातील प्रतिष्ठेची वर्ल्ड कॅरम चॅलेंज स्पर्धा ऑनलाइन स्पर्धा झाली. तसेच बुद्धिबळ स्पर्धाही ऑनलाइन पद्धतीनेच संपन्न झाली.

-----------------------------

Web Title: Damage to the sports field as well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.