वन्यप्राण्यांमुळे तुरीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:16 AM2020-12-23T04:16:11+5:302020-12-23T04:16:11+5:30

यंदा हरभरा, तुरीचे उत्पादन अपेक्षेनुसार होईल, असा शेतकऱ्यांचा अंदाज असतानाच रात्रीच्या सुमारास वन्यप्राणी शेतात घुसून पिकाची नासाडी करीत आहेत. ...

Damage to trumpets by wildlife | वन्यप्राण्यांमुळे तुरीचे नुकसान

वन्यप्राण्यांमुळे तुरीचे नुकसान

Next

यंदा हरभरा, तुरीचे उत्पादन अपेक्षेनुसार होईल, असा शेतकऱ्यांचा अंदाज असतानाच रात्रीच्या सुमारास वन्यप्राणी शेतात घुसून पिकाची नासाडी करीत आहेत. वनविभागाने या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी या भागातील शेतकरी करत आहेत.

..........................

आगर येथे विजेचा लपंडाव सुरूच

आगर : गत काही दिवसांपासून आगर येथे वीजपुरवठा दुपारी खंडित होत आहे. त्यामुळे विजेवर चालणारे व्यवसाय बंद राहत असून, त्यामुळे व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तरी याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी व्यावसायिक यांनी केली आहे.

..........................

बसथांब्याजवळ गतिरोधक बसविण्याची मागणी

दिग्रस बु. : येथील बसथांब्याजवळ गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. येथील बसथांबा हा चौरस रस्त्यावर असल्याने चारही बाजूने वाहनांची रेलचेल सुरू राहते. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या भागात गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे.

..........................

Web Title: Damage to trumpets by wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.