पिंजर परिसरात गहू, भुईमुगाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:19 AM2021-05-11T04:19:55+5:302021-05-11T04:19:55+5:30

गोळेगाव येथे रस्त्याचे काम निकृष्ट आलेगाव : ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गोळेगाव येथील श्री महादेव संस्थानच्या क वर्ग तीर्थक्षेत्र येथे ...

Damage to wheat, groundnut in cage area | पिंजर परिसरात गहू, भुईमुगाचे नुकसान

पिंजर परिसरात गहू, भुईमुगाचे नुकसान

Next

गोळेगाव येथे रस्त्याचे काम निकृष्ट

आलेगाव : ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गोळेगाव येथील श्री महादेव संस्थानच्या क वर्ग तीर्थक्षेत्र येथे विकास निधीतून रस्त्याचे काम करण्यात आले. या रस्त्याच्या कामात अनियमितता झाली असून, रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करीत संबंधित कंत्राटदाराचे देयक अदा करू नये, अशी मागणी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी बीडीओंकडे दिलेल्या तक्रारीतून केली आहे.

म्हातोडी येथे पाणीटंचाईची समस्या

म्हातोडी : परिसरातील घुसरवाडी, म्हातोडी येथे पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असून, पाण्यासाठी महिलांची भटकंती होत असल्याचे चित्र आहे. परिसरात खांबोरा पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा सुरू आहे. परिसरात २० दिवसांनंतर पाणी मिळत असून, ग्रामस्थांकडे साठवणुकीचे साहित्य नसल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे.

मनात्री परिसरात रोहींचा हैदोस

तेल्हारा : तालुक्यात मनात्री येथे रब्बी हंगामातील मका, गहू पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली आहे. पिके बहरलेली असताना रोहींचा हैदोस वाढला आहे. रोहींचा कळप शेतात शिरून पिकांचे नुकसान करीत आहेत. वनविभागाने वनप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

शेतशिवारात उष्णतेने शुकशुकाट

चोहोट्टाबाजार : परिसरात वातावरण चांगलेच तापू लागल्याने, वाढत्या तापमानामुळे दुपारी शेतशिवारात सर्वत्र शुकशुकाट राहत असल्याचे चित्र असून, शेतकऱ्यांकडून सकाळीच शेतीकामे उरकवून त्वरित माघारी फिरण्यावर भर दिल्या जात आहे

कंचनपूर-लोणाग्रा रस्त्याची दुरवस्था

हातरूण : कंचनपूर-लोणाग्रा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या मार्गाने अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे मार्गावरील खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात येत आहे.

पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी पाणपोईची सुविधा

मूर्तिजापूर : येथील स्वच्छता अभियानातर्फे इंदिरा गांधी नगरपालिका विद्यालयात पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी पाणपोईची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शाळेचे प्राचार्य जयदीप सोनखासकर, सत्यनारायण तिवारी, रोहित सोळुंके, ज्ञानेश्वर टाले, दिनेश श्रीवास, राकेश जोशी, विलास वानखडे, विलास नसले उपस्थित होते.

पनोरी येथे विजेचा लपंडाव

अकोट : गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यातील पनोरी येथे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत तक्रार करूनही समस्या जैसे थे असल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. वीजपुरवठा सुरळ‌ीत करण्याची मागणी होत आहे.

दिग्रस बु.-चान्नी फाटा रस्त्यावर वृक्षतोड

वाडेगाव : पातूर तालुक्यातील चान्नी फाटा-दिग्रस बु. रस्त्याचे काम नुकतेच झाले आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात झाडे असून, त्याच्या फांद्या वाढल्या आहेत. अपघाताची संभावना लक्षात घेता, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून फांद्या तोडण्याचे काम सुरू आहे.

महिला लाभार्थ्यांना कोंबड्यांचे वाटप

बोरगावमंजू : अकोला जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून बोरगाव मंजूतील पशुवैद्यकीय रुग्णालयात जिल्हा परिषद सदस्य नीता संदीप गवई यांच्या हस्ते गावातील सर्वसाधारण लाभार्थ्यांना कावेरी जातीच्या कोंबड्यांचे वाटप सोमवारी करण्यात आले. पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून बोरगावमंजूत सहा महिला लाभार्थ्यांना प्रत्येकी २५ मादी आणि ३ नर कोंबड्यांचे वाटप करण्यात आले.

वीजतारा लोंबकळल्या

मनात्री : तेल्हारा तालुक्यातील मनात्री खुर्द येथे गेल्या काही दिवसांपासून वीजतारा लोंबकळलेल्या असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. येथील वाॅर्ड क्रमांक १ मध्ये वीजतारा घरावर झुकल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत वारंवार निवेदन देऊनही स्थिती जैसे थे आहे.

वीज खांब देत आहे अपघाताला आमंत्रण

बार्शीटाकळी : शहरातील काही भागांमध्ये अनेक वर्षांपासून वीज खांब उभा आहे. मात्र, या खांबाला खालच्या भागाला गंज चढल्यामुळे खांब पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत दिसत आहे. एखाद्या वेळी खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे.

निंबा फाटा येथे गतिरोधक निर्माण करण्याची मागणी

हाता : येथून जवळच असलेल्या निंबा फाटा येथील रस्त्यांवर अपघाताची शक्यता लक्षात घेता, गतिरोधक निर्माण करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे. शेगाव-अकोट या रस्त्याचे काम सुरू असून, या मार्गावरून हजारो वाहने प्रवास करतात. निंबा फाट्यावर प्रवाशांची व वाहनांची भरपूर वर्दळ असते.

सलून व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी

मूर्तिजापूर : लॉकडाऊनमुळे सलून व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना दुकाने उघडण्याची परवानगी देण्याची मागणी करीत तालुका महाराष्ट्र नाभिक महामंडळाने तालुका अध्यक्ष भावेश झाला यांच्या नेतृत्वात निवेदन दिले.

बँकेत कर्मचारी नसल्याने ग्राहक त्रस्त

आगर : येथील अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथील बँकेत शेतकऱ्यांसह कर्मचारी, निवृत्तिवेतन धारक, निराधार तसेच शालेय विद्यार्थी, महिला बचत गट आदी मोठ्या संख्येने खातेदार आहेत. त्यामुळे बँकेतील कर्मचारी संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.

हातगाव येथील घरकुलाचा सर्व्हे चुकीचा

मूर्तिजापूर : हातगाव ग्रामपंचायतीअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेमधील नमुना-ड यादीतील सर्व्हे चुकीचा व अर्धवट करून अल्पसंख्याक, ओबीसी संवर्गातील पात्र लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप हातगाव येथील सरपंच अक्षय राऊत यांनी बीडीओंना दिलेल्या निवेदनातून केला, पात्र लाभार्थींची नावे यादीत समाविष्ट करण्याची मागणीही केली.

Web Title: Damage to wheat, groundnut in cage area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.