वऱ्हाडातील जलसाठा पोहोचला ६१ टक्क्यांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 05:53 PM2018-09-11T17:53:46+5:302018-09-11T17:53:54+5:30

अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांतील धरणातील साठा आजमितीस ६१.७१ टक्क्यांपर्यंत पोहोचला; पण अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा जलसाठा ६१.७१ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा हे मोठे धरण कोरडेच.

Dams water stock reached 61 percent! | वऱ्हाडातील जलसाठा पोहोचला ६१ टक्क्यांवर!

वऱ्हाडातील जलसाठा पोहोचला ६१ टक्क्यांवर!

Next


अकोला : वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांतील धरणातील साठा आजमितीस ६१.७१ टक्क्यांपर्यंत पोहोचला; पण अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा जलसाठा ६१.७१ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा हे मोठे धरण कोरडेच असून, इतरही धरणांमध्ये अल्प जलसाठा असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अकोला जिल्ह्याची जीवनरेखा काटेपूर्णा धरणाचा जलसाठा मात्र ९४.२७ टक्क्यांवर पोहोचल्याने अकोलेकरांसह शेतकºयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांत नऊ मोठे, २४ मध्यम व ४६६ लघू प्रकल्प आहेत. या सर्व धरणांमध्ये ११ सप्टेंबर रोजी ६१.७१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणामधील जलसाठा शून्य टक्केच आहे. अकोला शहराची जीवनवाहिनी असलेल्या काटेपूर्णा या मोठ्या धरणात ९४.२७ टक्के जलसाठा संकलित झाला आहे. याच जिल्ह्यातील निर्गुणा मध्यम धरणात १०० टक्के जलसाठा संकलित झाला असून, उमा १००, मोर्णा धरणात ५१.९५ टक्के, तर वान धरणात आतापर्यंत ९०.१९ टक्के जलसाठा संकलित झाल्याने या धरणाच्या दोन द्वारातून यापूर्वी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणात अद्याप एक थेंबही वाढ झाली नसल्याने या धरणाची पातळी शून्य टक्के आहे. याच जिल्ह्यातील कोराडी मध्यम धरणातील जलसाठा ८.९३ टक्के आहे. तोरणा १४.३२, तर उतावळी धरणातील पातळी ३८.८१ टक्के झाली आहे. याच जिल्ह्यतील नळगंगा या मोठ्या धरणात १८.९० टक्के, पेनटाकळी धरणात २०.२८ टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १९.९८ टक्के, पलढगमध्ये २२८.७६ टक्के, मन धरणात २५.६६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ९४.२० टक्के, एकबुर्जी व सोनल धरणात १०० टक्के जलसाठा आहे.
अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा धरणात ४७.६४ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये १००, अरुणावती ९४.२५, तर बेंबळा धरणात ६२.०२ टक्केच जलसाठा आहे.
- पश्चिम वºहाडातील अकोला जिल्ह्यातील धरणात यावर्षी बºयापैकी जलसाठा संचयित झाला असून, बुलडाणा जिल्ह्यात अद्याप पावसाची गरज आहे. अकोला जिह्यात बºयापैकी जलसाठा संचयित झाल्याने यावर्षी शेतकºयांना रब्बी व उन्हाळी पिकांना सिंचनासाठी पाणी देण्यात येईल.
अंकुर देसाई,
अधीक्षक अभियंता,
पाटबंधारे मंडळ, अकोला.

 

Web Title: Dams water stock reached 61 percent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.