रस्त्यांवर सडलेल्या फुलांचा खच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 01:36 PM2019-10-29T13:36:09+5:302019-10-29T13:36:18+5:30

सडक्या फुलांसह प्लास्टिक पिशव्या व इतर केरकचºयाचे ढीग साचून असल्याचे चित्र अकोलेकरांना पाहावयास मिळाले.

Dandelion flowers on the streets | रस्त्यांवर सडलेल्या फुलांचा खच

रस्त्यांवर सडलेल्या फुलांचा खच

Next


अकोला: दिवाळीनिमित्त शहरात विविध फुलांची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा पावसाने सळो की पळो करून सोडले. सलग बरसणाºया पावसामुळे शेतकºयांना मातीमोल भावाने फुलांची विक्री करावी लागली. त्यामुळे नाइलाजाने शेतकºयांना फुले, केळीची पाने तशीच रस्त्यालगत टाकून द्यावी लागली. एरव्ही रात्री दहानंतर मुख्य रस्त्यांच्या स्वच्छतेचा गवगवा करून सोशल मीडियावर स्वत:ची पाठ थोपटून घेणारा मनपाचा स्वच्छता विभाग मुख्य रस्त्यांकडे फिरकलाच नसल्यामुळे सोमवारी शहरातील मुख्य रस्त्यांवर सडक्या फुलांसह कचºयाचा खच साचल्याचे किळसवाणे चित्र पाहावयास मिळाले.
मागील सहा दिवसांपासून परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्याचा परिणाम दिवाळी सणावर दिसून आला. शहरात दिवाळीच्या पूजनानिमित्त विविध रंगबेरंगी व आकर्षक फुलांची विक्री करण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपºयातील शेतकरी दाखल झाले होते. तसेच लक्ष्मी मूर्ती, पणत्या, मडके, लाह्या, बत्तासे, झाडू, केळीची व आंब्याच्या पानांची विक्री करण्यासाठी किरकोळ व्यावसायिकांनी मुख्य रस्त्यांवर दुकाने थाटली होती. सलग बरसणाºया पावसामुळे शेतकºयांसह किरकोळ व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले. पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात फुले सडल्याने शेतकºयांना मातीमोल भावाने फुलांची विक्री करावी लागली. तसेच यंदा बाजारात फुलांची जास्त आवक झाल्यामुळे अनेक शेतकºयांनी आणलेली फुले रस्त्यालगत तशीच टाकू न द्यावी लागली. फुलांसह विविध साहित्याचा रस्त्यालगत खच साचल्याची परिस्थिती निर्माण झाली असताना महापालिकेच्या आरोग्य विभागाने रविवारी रात्री किंवा सोमवारी सकाळी ६ वाजतापासूनच साफसफाईच्या कामाला प्रारंभ करणे अपेक्षित होते. या परिस्थितीची जाणीव असतानासुद्धा मनपाचा आरोग्य व स्वच्छता विभाग दिवसभर फिरकलाच नाही, हे विशेष.

सणासुदीच्या दिवसांत स्वच्छता कागदावर
मनपा प्रशासनासह सत्ताधारी भाजपच्यावतीने शहरात स्वच्छतेच्या कामाचा गवगवा केला जात असतानाच ऐन सणासुदीच्या दिवसांत शहराच्या गल्लीबोळांसह मुख्य बाजार तसेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरल्याचे चित्र आहे. साफसफाईच्या मुद्यावर स्वच्छता विभागाचा कारभार हवेत सुरू असून, मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यात सत्तापक्ष सपशेल अपयशी ठरल्याचा सूर अकोलेकरांमधून उमटत आहे.


सत्तापक्षासह प्रशासन कुंभकर्णी झोपेत
यंदाच्या दिवाळी सणावर पावसाचे सावट दिसून आले. रविवारी दिवाळी साजरी झाल्यानंतर सोमवारी सकाळी मनपाच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने कामाला लागणे क्रमप्राप्त होते. मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी सडक्या फुलांसह प्लास्टिक पिशव्या व इतर केरकचºयाचे ढीग साचून असल्याचे चित्र अकोलेकरांना पाहावयास मिळाले. हा प्रकार पाहता सत्ताधारी भाजपसह प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचा आरोप अकोलेकरांमधून होत आहे.

Web Title: Dandelion flowers on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.