जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीला भीषण आग
By admin | Published: February 17, 2016 02:23 AM2016-02-17T02:23:23+5:302016-02-17T02:23:23+5:30
कानशिवणी येथील घटना; एक हजार कापूस गाठी खाक.
Next
बोरगाव मंजू (अकोला): कानशिवणी येथील जिनिंग-प्रेसिंगला आग लागल्याची घटना मंगळवारी घडली. दोन गोदामांना लागलेल्या आगीत कोट्यवधीचा गाठी जळून खाक झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. विनायकराव शेळके यांच्या मालकीची राधा-कृष्ण जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरी आहे. संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास टिन शेडमध्ये ठेवलेल्या कापसाच्या गाठींना आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीची माहिती अकोला व मूर्तिजापूर येथील अग्निशमन विभागाला देण्यात आली. रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळावर धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते.