दुर्गंधीत होतात रू ग्णांवर उपचार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 01:51 AM2017-08-04T01:51:00+5:302017-08-04T01:51:36+5:30
सायखेड : जुन्या इमारतीत पाणी तपासणी व इतर साहित्य कोंबल्याने त्यांचा दुर्गंध, अनेक वॉर्डांमध्ये अस्वच्छतेमुळे निर्माण झालेली घाण अशा वातावरणात बाश्रीटाकळी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे ‘लोकमत’ने ३ ऑगस्ट रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले आहे.
बबन इंगळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सायखेड : जुन्या इमारतीत पाणी तपासणी व इतर साहित्य कोंबल्याने त्यांचा दुर्गंध, अनेक वॉर्डांमध्ये अस्वच्छतेमुळे निर्माण झालेली घाण अशा वातावरणात बाश्रीटाकळी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे ‘लोकमत’ने ३ ऑगस्ट रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले आहे.
बाश्रीटाकळी शहरात रुग्णांच्या अत्यावश्यक सेवेसाठी असलेल्या ग्रामीण रुग्णालयातच सुविधांची कमी असल्याचा प्रकार ३ ऑगस्ट रोजी दिसून आला. रुग्णालयात जाऊन पाहणी केली असता, ज्या ठिकाणी वरच्या मजल्यावर ‘पिण्याचे पाणी’ असे फलक आहे, तेथे फक्त भिंतच दिसून आली. विरुद्ध दिशेने असलेला नळ बंद असून, काही वॉर्डांत स्वच्छतेअभावी दुर्गंधी येत असल्याचे दिसून आले. रुग्णांना वरच्या मजल्यावर नेण्यासाठी असलेली व्हीलचेअर जाळे लागलेल्या व धूळ बसलेल्या अवस्थेत आढळली. रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये पाणी नमुने तपासणी व इतर तपासणीसाठी प्रयोगशाळेचा कक्ष असून, उघड्यावर खोल्यामध्ये वाया गेलेले मटेरियल असल्याने त्यातून दुर्गंधी सुटली आहे. परिसरात स्वच्छतेचा अभाव असल्याने रुग्णालयात रुग्णांसोबत येणार्या नातेवाइकांचे आरोग्यसुद्धा धोक्यात येऊ शकते. पाणीपुरवठा करणारे दर्शनी भागाजवळील पंपिंग हाउसला घाणीचा वेढा असल्याने रुग्णालयात एखादेवेळी दूषित पाणीपुरवठासुद्धा होऊ शकतो. दुर्गंधीमध्येच रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.