डंम्पिंग ग्राउंडची समस्या निकाली न काढल्यास गंभीर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 02:05 PM2017-07-30T14:05:53+5:302017-07-30T14:05:53+5:30
अकोला : डंम्पिंग ग्राउंडवर साठवणूक केल्या जाणाºया कचºयावर प्रक्रिया होत नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, ही समस्या तातडीने निकाली न काढल्यास आगामी दिवसांत सत्ताधाºयांसह प्रशासनाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा खणखणीत इशारा महापालिकेचे विरोधी पक्षनेता साजीद खान यांनी शनिवारी दिला आहे.
नायगावस्थित महापालिकेच्या मालकीच्या जागेवर कचºयाची साठवणूक केली जाते. कचºयावर प्रक्रिया होत नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, जलस्रोत दूषित झाले आहेत. प्रक्रिया करून कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी स्थानिक नागरिकांसह विविध संघटनांनी आजपर्यंत महापालिकेला असंख्य निवेदने सादर केली. त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे पाहून नागरिकांनी मनपाच्या घंटा गाड्यांची तोडफोड केली. हा प्रकार निंदनीय व अशोभनीय असला, तरी आजपर्यंत कचºयाची समस्या निकाली काढण्यासाठी सत्ताधाºयांसह प्रशासनाने काय उपाययोजना केली, असा प्रश्न उपस्थित करीत विरोधी पक्षनेता साजीद खान यांनी सत्ताधाºयांवर शाब्दिक हल्ला चढविला आहे. नागरिकांनी घंटा गाड्यांवर दगडफेक का केली, यावर सत्ताधारी व प्रशासनाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. नागरिकांना हातात दगड घेण्यास भाग पाडणाºया सत्ताधारी पक्षातील पदाधिकाºयांवर गुन्हे का दाखल करण्यात येऊ नयेत, असा सवाल उपस्थित करीत डंम्पिंग ग्राउंडची समस्या तातडीने निकाली न काढल्यास सत्ताधाºयांसह प्रशासनाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा विरोधी पक्षनेता खान यांनी दिला आहे.