महावितरणचा एक दिवस सैनिकासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:18 AM2021-04-11T04:18:07+5:302021-04-11T04:18:07+5:30

विजेची गरज आणि महत्व बघता सैनिकांना वीज समस्यांना सामोरे जाऊ लागू नये यासाठी प्रथम त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी ...

A day of MSEDCL for a soldier | महावितरणचा एक दिवस सैनिकासाठी

महावितरणचा एक दिवस सैनिकासाठी

Next

विजेची गरज आणि महत्व बघता सैनिकांना वीज समस्यांना सामोरे जाऊ लागू नये यासाठी प्रथम त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी राज्यातील माजी सैनिकाकडून मांडण्यात आलेल्या १९ समस्यांचे अधिक्षक अभियंताकडून योग्य माहिती देऊन समाधान करण्यात आले. तसेच अकोला माजी सैनिक फेडरेशनच्या सदस्यानी वीज पुरवठ्याशी सबंधित मांडलेल्या २३ समस्यांचेही तात्काळ निवारण करण्याची ग्वाही अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी दिली.

यावेळी महावितरणकडून माजी सैनिक शेतकरी,उद्योजक यांना असलेले फायदे, सौर ऊर्जा जोडणी याबाबत अधिक्षक अभियंतांनी सविस्तर मार्गदर्शन केले,तसेच कृषी वीज जोडणी धोरण २०२० अंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना असलेली भरघोस सवलत आणि थकबाकीमुक्तीची असलेली संधी याची संपूर्ण माहिती देण्यात आली. महावितरणची संपूर्ण यंत्रणा ही ऑनलाईन झाल्याने वीज जोडणीच्या अर्जापासून तर वीजबिल कसे भरायचे,वीज विषयक तक्रार दाखल करणे,महावितरण मोबाईल ॲप कसा वापरायचा याचा प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाव्दारे माहिती देण्यात आली.

जिल्ह्यातील तसेच राज्यातील माजी सैनिकासाठी चर्चासत्र घेऊन त्यांच्या समस्यांचे निराकरणासाठी घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात माजी सैनिक फेडरेशनचे लक्ष्मण मोरे,गंगाधर दांदळे, रामेश्वर लांडगे,शंकर देशमुख, शांताराम काळे, पुरुषोत्तम चेडे, प्रकाश राठोड, हिंमतराव पोहरे,गजानन माळी, भिकाजी भगत, विट्टल चिकटे, मुरलीधर आवटे, प्रकाश बाहेकर, विलास आगरकर,सोपान वत्स,शरद लोटे, भागवत गिरी, सुरेश वडे, मुरलीधर झटाले, संजय वेध,आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन माजी सैनिक सुभाषराव म्हैसने यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी सैनिक रामेश्वर लांडगे यांनी मानले.

Web Title: A day of MSEDCL for a soldier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.