नागपंचमीच्या दिवशी नागाला जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:23 AM2021-08-14T04:23:57+5:302021-08-14T04:23:57+5:30

-------------- कंझरा परिसरात सोयाबीन पिकावर फवारणीला सुरुवात कंझरा: मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या कंझरा शिवारात सोयाबीनचे पीक बहरले ...

On the day of Nagpanchami, Naga was given life | नागपंचमीच्या दिवशी नागाला जीवनदान

नागपंचमीच्या दिवशी नागाला जीवनदान

Next

--------------

कंझरा परिसरात सोयाबीन पिकावर फवारणीला सुरुवात

कंझरा: मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या कंझरा शिवारात सोयाबीनचे पीक बहरले असून, किडींच्या बंदोबस्तासाठी शेतकरी फवारणी करीत असल्याचे चित्र आहे. सोयाबीनवर चक्रीभुंगा, उंट अळीचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकरी फवारणी करीत आहेत.

-------------------

भेंडगाव येथे बकऱ्याची धाडसी चोरी

भेंडगाव: पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम भेंडगाव येथील बस स्टॅन्ड परिसरातील संतोष गावंडे यांच्या गोट फार्ममधील आठ बकऱ्यांची अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना दि. ११ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार, येथील गोट फार्ममध्ये मुक्कामी असलेल्या निरंजन भुयार यास धारदार शस्त्राचा धाक दाखवून फार्ममधील आठ बकऱ्या लंपास केल्या. त्यामध्ये सहा बकऱ्या संतोष गावंडे यांच्या मालकीच्या होत्या, तर दोन बकऱ्या माजी सैनिक महादेव काळदाते यांच्या मालकीच्या होत्या. अज्ञात चोरट्यांनी अशा एकूण आठ बकऱ्या अंदाजे किंमत १ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्या. रात्रीच्या सुमारास पिंजर येथे धाव घेऊन पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: On the day of Nagpanchami, Naga was given life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.