जिल्ह्यात राबविणार व्यसनमुक्ती अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:25 AM2021-08-17T04:25:04+5:302021-08-17T04:25:04+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, ...
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी ना. कडू म्हणाले की, समाजात व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढू नये, तसेच भावीपिढी ही व्यसनांच्या विळख्यात येऊ नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी आता सध्या समाजात जे व्यसनाधीन व्यक्ती आहेत. त्या व्यक्तींची माहिती ग्रामीण भागात पोलीस पाटील व शहरात पोलीस स्टेशन निहाय घेण्यात यावी. व्यसनाधीन व्यक्ती व्यसनांच्या किती आहारी गेली आहे,त्याचे प्रमाण पाहून त्यांना औषधोपचार व समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देता येईल. यासाठी पोलीस स्टेशन निहाय माहिती सादर करावी,असे निर्देशही कडू यांनी यंत्रणेला दिले.
या माध्यमातून व्यसनमुक्तीचे एक चांगले मॉडेल विकसित करण्याचा आपला मनोदय असल्याचे कडू यांनी स्पष्ट केले.