मूर्तिजापूर एसडीओ कार्यालयाच्या आवारात आढळला मृत कावळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 08:55 PM2021-02-02T20:55:40+5:302021-02-02T20:56:23+5:30
Murtijapur News एसडीओ कार्यालयाच्या आवारात मृत कावळा आढळून आला.
मूर्तिजापूर : येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या आवारात कावळा मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत कावळा येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आला.
सदर कावळ्याला गत दोन दिवसांपासून उडता येत नसल्याने उपविभागीय कार्यालयाच्या परिसरात फिरत होता परंतु मंगळवारी सकाळी तो कावळा कार्यालयाच्या आवारातील मुत्रीघरात मृतावस्थेत आढळून आला. मृत कावळा येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात शितगृहात ठेवला असून पुढील आदेश आल्यानंतरच त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे व एसडीओ कार्यालयापासून १ किलोमीटर चा परिसर सतर्क क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून कुकुट पालन (पोल्ट्री फॉर्म व्यवसाय) यावर विशेष भर असल्याची माहिती सहायक आयुक्त पशुसंवर्धन आर. बी. जावरकर यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली. काही दिवसांपुर्वी चार चिमण्या हातगाव हद्दीत राहणारे राम हिंगणकर यांच्या घरी आढळून आल्या होत्या हे विशेष.
मृत कावळा हे पिल्लू असल्याचे निदर्शनास आले असून ते वरुन खाली पडल्याने क्षतिग्रस्त झाले आहे. तो कावळा आम्ही ताब्यात घेतला असून त्याला चार दिवस शितगृहात ठेवण्यात येणार असून पुढील आदेश आल्यास त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.
- डॉ. आर. बी. जावरकर
सहायक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघु पशुचिकित्सालय, मूर्तिजापूर