टीईटी अर्जासाठी २८ नोव्हेंबरपर्यंत डेडलाइन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 02:06 PM2019-11-26T14:06:32+5:302019-11-26T14:06:32+5:30

टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

Deadline for TET application by November 7! | टीईटी अर्जासाठी २८ नोव्हेंबरपर्यंत डेडलाइन!

टीईटी अर्जासाठी २८ नोव्हेंबरपर्यंत डेडलाइन!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिक्षक पात्रता परीक्षा १९ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. टीईटी परीक्षेसाठी २८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
टीईटीच्या संकेतस्थळावर या परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने या परीक्षेचे नियम निश्चित केले आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी उच्च प्राथमिक शिक्षक पदाच्या उमेदवारांना आता पदवीचा विषय घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. शाळांमध्ये शिक्षकांची नोकरी करण्यासाठी २0१३ पासून टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परीक्षेला परवानगी मिळावी, यासाठी परीक्षा परिषदेकडून शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला आॅक्टोबर महिन्यात मान्यता देण्यात आली. शासनाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यास प्रारंभ केला होता. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकविण्यासाठी पहिला व दुसरा असे दोन्ही पेपर उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. इयत्ता सहावी ते आठवीच्या गटातील उच्च प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी परीक्षेतील दुसरा पेपर उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
टीईटी परीक्षा १५0 गुणांची असून, यात १५0 वस्तुनिष्ठ प्रश्न विचारण्यात येणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला एक गुण दिला जाणार आहे. टीईटी परीक्षेत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र मराठी, इंग्रजी व्याकरण, गणित परिसर अभ्यास आदी विषयांवरील प्रश्नांचा समावेश राहणार आहे. या परीक्षेची संपूर्ण माहिती परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. विद्यार्र्थ्यांना आॅनलाइन अर्ज करावा लागणार आहे.

परीक्षेचे वेळापत्रक या प्रमाणे
आॅनलाइन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी ८ ते २८ नोव्हेंबर, प्रवेशपत्र आॅनलाइन प्रिंट काढून घेणे ४ ते १९ जानेवारी, टीईटी परीक्षा पेपर १ ची वेळ सकाळी १0.३0 वाजता, सीईटी पेपर २ दुपारी २ वाजता राहणार आहे. काही बदल झाल्यास शिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर तपासून घ्यावे.

Web Title: Deadline for TET application by November 7!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.