अकोट तालुक्यातील पणज येथे एकाच वेळी १२ बकर्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 02:18 AM2018-02-16T02:18:04+5:302018-02-16T02:18:13+5:30
अकोट : तालुक्यातील पणज येथे १२ बकर्यांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याची घटना १५ फेब्रुवारी रोजी घडली. बकर्यांचे शवविच्छेदन व पंचनामा करण्यात आल्याची माहिती अकोट ग्रामीण पोलिसांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : तालुक्यातील पणज येथे १२ बकर्यांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याची घटना १५ फेब्रुवारी रोजी घडली. बकर्यांचे शवविच्छेदन व पंचनामा करण्यात आल्याची माहिती अकोट ग्रामीण पोलिसांनी दिली.
पणज गावातील विविध शेतकर्यांच्या बकर्या गोळा करून त्या गुराखी नेहमीप्रमाणे चराईकरिता घेऊन गेला. दरम्यान, गावाबाहेरील रस्त्यावर एक-एक करून कळपातील १२ बकर्या खाली पडून त्यांचा मृत्यू झाला. या बकर्यांचा मृत्यू हा विषबाधेने झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक शहाजी रुपनर, पो.काँ. गजानन भगत, प्रवीण गवळी, केशव मोंढे हे घटनास्थळावर दाखल झाले. मृत बकर्यांचे पशुवैद्यकीय अधिकारी चव्हाण यांनी शवविच्छेदन केले. आधीच शेतकर्यांवर संकटांची मालिका सुरू असताना पशुधनावरसुद्धा अकस्मात संकट कोसळले आहे.