आणखी एकाचा मृत्यू; २६ पॉझिटिव्ह, १५ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 18:24 IST2020-11-16T18:23:10+5:302020-11-16T18:24:32+5:30
Akola CoronaVirus News आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २८४ वर गेला आहे.

आणखी एकाचा मृत्यू; २६ पॉझिटिव्ह, १५ कोरोनामुक्त
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असून, सोमवार, १६ नोव्हेंबर रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २८४ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी २६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,७५० झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ९० अहवाल प्राप्त झाले. यापैकी २६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ६४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये विजय हाऊस सोसायटी येथील चार, खडकी येथील तीन, जीएमसी, डाबकी रोड व पातूर येथील प्रत्येकी दोन, कौलखेड, पारस, न्यू राधकीसन प्लॉट, ज्योती नगर, गोरक्षण रोड, दत्ता कॉलनी, सिटी कोतवाली, पीआयएल कॉलनी, आकाशवाणी कॉलनी, विठ्ठल नगर, कैलास टेकडी, निंबोळी ता. तेल्हारा व कृषी नगर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
७६ वर्षीय वृद्धचा मृत्यू
सोमवारी जठारपेठ भागातील ७६ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना १५ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.
१५ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १२, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, तर हॉटेल रिजेंसी येथून एक अशा एकूण १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
३१३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,७५० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८१५३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३१३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.