आणखी एकाचा मृत्यू ; १० नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 12:14 PM2020-10-19T12:14:54+5:302020-10-19T12:15:31+5:30

आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८०६७ झाली आहे.

Death of another; Addition of 10 new Corona positive patients in Akola | आणखी एकाचा मृत्यू ; १० नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर

आणखी एकाचा मृत्यू ; १० नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग कमी होत असला, तरी या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची संख्या मात्र वाढतच आहे. सोमवार, १९ आॅक्टोबर रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २६६ वर पोहचला आहे. दरम्यान, आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८०६७ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे ४९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १० रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये रणपिसे नगर येथील सहा जणांसहा सिंधी कॅम्प, एसपी आॅफिस जवळ, गोकुळ कॉलनी व मोठी उमरी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.

गोकुळ कॉलनीतील महिलेचा मृत्यू
सोमवारी आणखी गोकुळ कॉलनी, जवाहर नगर येथील ७२ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेस १७ आॅक्टोंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

४६४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,०६७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,३३७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २६६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४६४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Death of another; Addition of 10 new Corona positive patients in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.