अनेक प्रज्ञावंत घडविणारे परनाटे सर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:19 AM2021-04-04T04:19:26+5:302021-04-04T04:19:26+5:30
अकोला : टॅलेंट अॅन्ड मेरिट सर्च सेंटर्सचे संस्थापक प्रा. पुरूषोत्तम महादेव परनाटे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान ...
अकोला : टॅलेंट अॅन्ड मेरिट सर्च सेंटर्सचे संस्थापक प्रा. पुरूषोत्तम महादेव परनाटे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.
स्थानिक मराठा मंगल कार्यालय परिवाराशी गेल्या अनेक वर्षांपासून ते जुळले होते. ’परनाटे सर यांनी ९० च्या दशकात प्रज्ञावंतांचा शोध घेण्यासाठी टॅलेंट अॅन्ड सर्च सेन्टरची स्थापना करून अनेक डॉक्टर्स, इंजिनियर्स घडविले. त्यांच्या विद्यार्थिनी राहिलेल्या अकोटच्या वंदना वसू या दहावी परीक्षेत मेरिट आल्या होत्या. सध्या डॉ. वंदना भरत पटोकार या जिल्हा स्त्री रूग्णालयात सेवा देत आहेत. डॉ. वंदना यांच्यासह मेडिकल, इंजिनियर्ससह भाभा रिसर्च सेन्टर, सैन्य दलातही अधिकारी वर्गात त्यांचे विद्यार्थी कार्यरत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. मोहता मिल मोक्षधामवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवाला त्यांच्या कन्या चित्रा आखरे यांनी चिताग्नी दिला. यावेळी आ. रणधीर सावरकर, डॉ. विनीत हिंगणकर, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधिक्षका डॉ. आरती कुलवाल, प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात मुलगी चित्रा जावई विश्वेश्वर आखरे यांच्यासह नातवंडे व मोठा आप्त परिवार आहे.