चाऱ्याअभावी शेळ््या-मेढ्यांचा मृत्यू; चारा छावण्या सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 02:53 PM2019-07-02T14:53:40+5:302019-07-02T14:53:44+5:30
गावांमध्ये तातडीने चारा छावण्या सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली.
अकोला: दुष्काळग्रस्त तेल्हारा तालुक्यात जनावरांना चारा उपलब्ध नाही. मृग नक्षत्रातही पाऊस न पडल्याने चारा उगवलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील करी रूपागड, भिली, चित्तलवाडी, धोंडाआखर या गावांमध्ये आतापर्यंत ५० पेक्षाही अधिक शेळ््या-मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. या गावांमध्ये तातडीने चारा छावण्या सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. सोबतच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकाºयांनाही समस्या निकाली काढण्याची मागणी करण्यात आली.
तेल्हारा तालुका दुष्काळग्रस्त आहे. तसेच उत्तरेकडील भाग डोंगराळ आहे. या भागात मृग आटोपला तरीही पाऊस पडला नाही. त्यामुळे चाराही उगवलेला नाही. त्यातच या भागातील ग्रामस्थांकडे मोठ्या प्रमाणात जनावरे आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शेळ््या-मेंढ्या आहेत. या जनावरांना गावलगत चारा उपलब्ध नाही. तर काही भाग व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये दाखवून डोंगरात चराईबंदी आहे. या दुहेरी अडचणीत पशुपालक अडकले आहेत. ऐन पावसाळ््यात चारा उपलब्ध नसल्याने जनावरांचा त्याअभावी मृत्यू होत आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून चारपैकी कोणत्याही गावात चारा छावणी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी १८ जून रोजीच जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे केली; मात्र अद्यापही उपाययोजना झाल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी सोमवारी पुन्हा जिल्हाधिकाºयाकडे धाव घेतली. जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे यांच्यासह ग्रामस्थ बोदर करंडे, सोनाजी पिसाळ, सोनाजी महारनर, छोडू महारनर, चवळीराम करंडे, दशरथ करंडे, नाना पिसाळ, विठ्ठल मार्कंड, तानू मार्कंड, नाना चांडे, मरकू कुरडकर, चैत्रा फडगर, गुलाब भोदे उपस्थित होते.
- जिल्हा परिषदेचा प्रस्तावच नाही
विशेष म्हणजे, या भागात तातडीने चारा छावण्या सुरू करण्याच्या मागणीचा ठराव गेल्या सर्वसाधारण सभेत गोपाल कोल्हे यांनी मांडला होता. तो मंजूरही आहे. त्या ठरावानुसारचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने अद्यापही जिल्हाधिकारी, शासनाकडे पाठवला नाही. त्यामुळे ग्रामस्थांची ही समस्या ‘जैसे थे’ आहे.