निधन वार्ता : कोकिळाबाई इंगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:18 AM2021-03-31T04:18:55+5:302021-03-31T04:18:55+5:30

सायखेड : शिंदखेड येथील रहिवासी कोकिळाबाई नाजूक इंगळे (४७) यांचे २९ मार्च रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात ...

Death story: Kokilabai Ingle | निधन वार्ता : कोकिळाबाई इंगळे

निधन वार्ता : कोकिळाबाई इंगळे

Next

सायखेड : शिंदखेड येथील रहिवासी कोकिळाबाई नाजूक इंगळे (४७) यांचे २९ मार्च रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, ३ मुले, मुलगी, बहिणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दिल्ली येथे सैनिक सेवेत कार्यरत असलेल्या सागर इंगळे यांच्या त्या आई होत.

फोटो

................

शॉक लागून महिलेचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोली जहागीर : येथील संजीवनी प्रशांत रनगीरे वय ३१ ही महिला कुलरमध्ये पाणी टाकत असताना पाण्याच्या मशीनचा शॉक लागून महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी दोनच्या सुमारास घडली. पाण्याची मशीन सुरू करून कुलरमध्ये पाणी टाकताना हा अपघात घडला. मृतक महिलाही विवाहित असून तिला दोन अपत्य आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी मनोज कोल्हटकर व पोलीस कॉन्स्टेबल उमेश चव्हाण यांनी घटनेचा पंचनामा केला

.................

चिखलगाव येथील आरओ प्लांट बंद; पिण्याच्या पाण्याची गैरसोय.

चिखलगाव : गेल्या आठ दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचे फिल्टर लाईट बिल न भरल्यामुळे बंद असल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत नसल्याने नागरिकांना मध्ये नाराजी व्यक्त होत आहे कमी दरात ५रू याप्रमाणे फिल्टर केलेले पाणी एकदम स्वस्त दरात मिळत असल्याने नागरिक एकदम खुश होते आता अचानक पाणी बंद झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे अगोदर च कोराेना मूळे आवक मंदावली असतानाच २०रू ची कॅन घेणे परवडत नाही यामुळे सरपंचनी लक्ष घालून ग्रामपंचायत यांनी बिल भरून आर ओ प्लांट सुरू करावा अशी मागणी हाेत आहे

Web Title: Death story: Kokilabai Ingle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.