गोवर, रुबेला लसीकरणानंतर विद्यार्थीनीचा मृत्यू, नागरिकांत संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 07:42 PM2018-12-13T19:42:35+5:302018-12-13T19:43:10+5:30

गोवर, रुबेला गोवर, रुबेला लसीकरणाची मोहिम राज्यातील अनेक जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

The death of students after the vaccination of cattle, rubella in akola | गोवर, रुबेला लसीकरणानंतर विद्यार्थीनीचा मृत्यू, नागरिकांत संताप

गोवर, रुबेला लसीकरणानंतर विद्यार्थीनीचा मृत्यू, नागरिकांत संताप

Next

अकोला - गोवर, रुबेला लसीकरणामुळे मिलिंद विद्यालयातील एका विद्यार्थीनीच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला. सर्वोपचारमध्ये तिच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू झाला. त्यानंतर प्रकृतीमध्ये काही प्रमाणात सुधारणा झाल्यावर डॉक्टरांनी तिला सुट्टी दिली. पण, घरी पोहोचताच त्या विद्यार्थीनीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेबाबत लोकांमधून भीती व्यक्त होत आहे. 

गोवर, रुबेला गोवर, रुबेला लसीकरणाची मोहिम राज्यातील अनेक जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. मात्र, अनेक ठिकाणी या लसीकरणाचा फटका शाळकरी मुलांन बसला आहे. बुलडाणा जिल्ह्यात 21 जणांना किरकोळ रिअ‍ॅक्शन आल्या होत्या. सध्या त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांनी स्पष्ट केले. तर, पुणे आणि सोलापूर येथीही अशा रिअॅक्शनच्या घटना उघडकीस आल्या आहेत. 
दरम्यान, गेल्या काळात देशातून देवी, पोलिओ आणि नारू आणि गर्भवती महिलांमधील धनुर्वाताचा आजार आज पूर्णत: हद्दपार करण्यात आल्यानंतर आता गोवर व रुबेला हद्दपार करण्यासाठी आरोग्य विभागाने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यातंर्गत इंजेक्शनद्वारे केल्या जाणारी ही लसिकरण मोहिम ही राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी मोहिम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

मिझल्स, रुबेला हा सात ते आठ दिवसात ठिक होत असला तरी त्यानंतर आजारी व्यक्तीमध्ये न्युमोनिया, मेंदुज्वर, कुपोषणासाबेतच अंधत्व तथा मेंदुचा आजार होण्याची शक्यता असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतागुंत होऊन रुग्ण दगावण्याचे प्रमाणही वाढते आहे. त्याचीच प्रचिती अकोला जिल्ह्यात आली आहे. येथील एका विद्यार्थीनीच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला. सर्वोपचारमध्ये तिच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू झाला. मात्र, घरी पोहोचल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची खबळजनक घटना घडली. या घनटेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होते.
 

Web Title: The death of students after the vaccination of cattle, rubella in akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.