पाणी भरताना विद्युत मोटारचा शॉक लागल्याने महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 04:10 PM2019-06-04T16:10:48+5:302019-06-04T16:10:53+5:30

सिरसोली (जि. अकोला) : विद्युत मोटारच्या सहाय्याने पाणी भरत असताना शॉक लागल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, ४ जून रोजी तेल्हारा तालुक्यातील सिरसोली येथे घडली.

Death of a woman due to electric shock of water while filling the water | पाणी भरताना विद्युत मोटारचा शॉक लागल्याने महिलेचा मृत्यू

पाणी भरताना विद्युत मोटारचा शॉक लागल्याने महिलेचा मृत्यू

Next

सिरसोली (जि. अकोला) : विद्युत मोटारच्या सहाय्याने पाणी भरत असताना शॉक लागल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, ४ जून रोजी तेल्हारा तालुक्यातील सिरसोली येथे घडली. पुजा प्रदिप आखरे (२८) असे या महिलेच नाव आहे.
सिरसोली गावात भीषण पाणीटंचाई असून, आठ दिवसानंतर नळाला पाणी येते. मंगळवारी घरगुती नळांला पाणी आल्यानंतर पूजा यांनी विद्युत मोटार सुरु केली. पाणी भरत असताना पूजा यांना विद्युत मोटारचा शॉक लागला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. पूजा यांचे चार वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. त्यांना अडीच वर्षांची मुलगी आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Death of a woman due to electric shock of water while filling the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.