आणखी ८५ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती; ८५३ गावांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 11:36 AM2020-03-01T11:36:11+5:302020-03-01T11:36:34+5:30

याद्यानुसार शेतकºयांची पडताळणी आणि बँक खाते व आधार क्रमांक प्रमाणीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.

Debt relief to 85,000 farmers; 853 villages included | आणखी ८५ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती; ८५३ गावांचा समावेश

आणखी ८५ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती; ८५३ गावांचा समावेश

Next

अकोला: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांपैकी दुसºया टप्प्यात जिल्ह्यात 853 गावांमध्ये 85 हजार 813 शेतकºयांच्या गावनिहाय याद्या शनिवार, २९ फेबु्रवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या. याद्यानुसार शेतकºयांची पडताळणी आणि बँक खाते व आधार क्रमांक प्रमाणीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे.
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख १२ हजार ३७९ शेतकरी पात्र ठरले असून, त्यापैकी बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्यात आलेल्या १ लाख ११ हजार ७९ शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या. कर्जमुक्तीसाठी पात्र शेतकºयांपैकी गावनिहाय याद्या प्रसिद्ध करण्याच्या पहिल्या टप्प्यात गोरेगाव आणि देगाव या दोन गावांतील ८१० शेतकºयांच्या याद्या २४ फेबु्रवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यानंतर दुसºया टप्प्यात जिल्ह्यातील सातही तालुक्यांत 853 गावांतील पात्र 85 हजार 813 शेतकºयांच्या याद्या २९ फेबु्रवारी रोजी शासनामार्फत आॅनलाइन प्राप्त झाल्या. प्राप्त झालेल्या शेतकºयांच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. प्रसिद्ध करण्यात आलेल्या याद्यानुसार बायोमेट्रिक मशीनवर बोटांचे ठसे घेऊन शेतकºयांची पडताळणी तसेच बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व कर्जखात्यातील रक्कम यासंदर्भात प्रमाणीकरणाचे काम प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले आहे.

गावनिहाय ‘या’ ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आल्या याद्या!
जिल्ह्यातील 853 गावांत पात्र शेतकºयांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. संबंधित ग्रामपंचायत कार्यालय, सेवा सहकारी संस्था, सेतू, आधार केंद्र, सीएससी व बँकांच्या शाखा इत्यादी ठिकाणी शेतकºयांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या.
 



जिल्ह्यातील पात्र ८६ हजार ६२३ शेतकºयांच्या याद्या २९ फेबु्रवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या असून, याद्या प्रमाणीकरणाचे काम सुरू करण्यात आले.
- डॉ. प्रवीण लोखंडे,
जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

 

Web Title: Debt relief to 85,000 farmers; 853 villages included

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.