कर्जमुक्ती योजना आधार प्रमाणीकरण शिबिराचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:15 AM2021-01-02T04:15:44+5:302021-01-02T04:15:44+5:30

यासंदर्भात दिलेल्या माहितीपत्रकात म्हटले आहे की, महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत दि. १ एप्रिल २०१५ ते ३१ ...

Debt Relief Scheme Aadhaar Certification Camp | कर्जमुक्ती योजना आधार प्रमाणीकरण शिबिराचे आयोजन

कर्जमुक्ती योजना आधार प्रमाणीकरण शिबिराचे आयोजन

Next

यासंदर्भात दिलेल्या माहितीपत्रकात म्हटले आहे की, महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत दि. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीमध्ये कर्ज घेतलेल्या व दि. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत व्याजासह दोन लाखांपर्यंत थकीत कर्जाची रक्कम संबंधित पात्र शेतकऱ्याच्या कर्जखात्यावर शासनामार्फत वर्ग करण्यात येते.

जिल्ह्यात दि. २४ डिसेंबर २०२० अखेर एक लाख १५ हजार ६७६ खाती अपलोड करण्यात आली आहेत. त्यापैकी एक लाख एक हजार २९४ खातेदारांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. त्यापैकी ९९ हजार ३०८ पात्र खातेदारांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले आहे. अद्याप १९८६ पात्र खातेदारांचे प्रमाणीकरण शिल्लक आहे.

या योजनेंतर्गत संबंधित बँकांनी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर शेतकऱ्यांचा डाटा भरलेला असून, त्यांची छाननी करून पात्र शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर उपलब्ध आहेत. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे शिल्लक आहे, अशा पात्र लाभार्थ्यांसाठी सोमवार, दि. ४ रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थांचे साहाय्यक निबंधक (प्रशासन) एस. डब्ल्यू. खाडे यांनी केले आहे.

बाॅक्स

आधार प्रमाणीकरण रखडले

जिल्ह्यात अकोला तालुक्यातील ४३०, अकोट- २६९, बाळापूर- ४५९, बार्शिटाकळी- १३७, मूर्तिजापूर- २७१, पातूर- १५० व तेल्हारा तालुक्यातील २७० अशा एकूण १९८६ पात्र खातेदारांचे आधार प्रमाणीकरण करणे शिल्लक आहे. जिल्ह्यातील लाभार्थी यादीतील आधार प्रमाणीकरण न झालेल्या या सर्व पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या सी.एस.सी. किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. आधार प्रमाणीकरणासंदर्भात काही अडचणी असल्यास आपल्या बँकेचे शाखा व्यवस्थापक, सेवा सहकारी संस्थेचे सचिव, तालुका उपसाहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था अकोला कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे

Web Title: Debt Relief Scheme Aadhaar Certification Camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.