कर्जमुक्ती योजना : आधार प्रमाणिकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:51 AM2021-02-20T04:51:09+5:302021-02-20T04:51:09+5:30

यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दि. ...

Debt Relief Scheme: Verify Aadhaar | कर्जमुक्ती योजना : आधार प्रमाणिकरण करा

कर्जमुक्ती योजना : आधार प्रमाणिकरण करा

googlenewsNext

यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयातून प्राप्त माहितीनुसार, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दि. १ एप्रिल २०१५ ते दि.३१ मार्च २०१९ या कालावधीत कर्ज घेतलेल्या व दि.३० सप्टेंबर २०१९ पर्यंत व्याजासह दोन लाख रुपये थकीत कर्जाची रक्कम शासनामार्फत शेतकऱ्याच्या कर्ज खात्यावर वर्ग करण्यात येते.

या अंमलबजावणी प्रक्रियेत यापूर्वी विशिष्ट क्रमांकासह कर्जखाती सहा याद्या आधार प्रमाणिकरणासाठी ऑनलाईन पोर्टलवर प्राप्त झाल्या आहेत तसेच दि. १ जानेवारी २०२१ रोजी आणखी एक सातवी यादी प्राप्त झाली आहे. लाभार्थी शेतकऱ्यांची यादी बॅंकांच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात अद्याप पावेतो २६१९ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण शिल्लक आहे. त्यात अकोला तालुक्यातील ५७९, अकोट-३३१, बाळापूर-४४८, बार्शी टाकळी-१७२, मूर्तिजापूर-३४१, पातूर-३४२, तेल्हारा-४०६ याप्रमाणे एकूण २६१९ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण बाकी आहे. तरी या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या नजिकच्या सीएसी अथवा आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन आपले आधार प्रमाणिकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Debt Relief Scheme: Verify Aadhaar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.