मयत शेतक-याच्या नावाने दाखवले कर्ज
By Admin | Published: June 26, 2017 09:49 AM2017-06-26T09:49:16+5:302017-06-26T09:49:16+5:30
२००३ मध्ये निधन झालेल्या शेतक-याने २००८ मध्ये कर्ज घेतल्याची नोंद खरब ढोरे येथील सेवा सहकारी सोसायटीने केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : सन २००३ मध्ये निधन झालेल्या शेतकऱ्याने २००८ मध्ये कर्ज घेतल्याची नोंद खरब ढोरे येथील सेवा सहकारी सोसायटीने केली आहे. मयत शेतकऱ्याचा मुलगा सेवा सहकारी सोसायटीमध्ये नो ड्युज सर्टिफिकेट घेण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. याविषयी संबधीत शेतकरी पुत्राने जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देउन न्याय देण्याची मागणी केली आहे.
खरब (ढोरे) येथील सुखदेव चेंडाजी तायडे यांचा ३० नोव्हेंबर २००३ रोजी मृत्यू झाला; परंतु सेवा सहकारी सोसायटी खरब, जितापूर (नाकट) ने त्यांचा मृत्यू झाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी सन २००८ मध्ये त्यांनी १८ हजारापेक्षा जास्त कर्ज घेतल्याचे सोसायटीच्या रेकॉर्डवर आहे. मयत तायडे यांचे वारस वसंत तायडे हे सेवा महाराष्ट्र बँकेकडून पीक कर्ज घेण्यासाठी ह्यनो ड्युजह्ण घेण्यासाठी जिल्हा बँक (शहर शाखा) येथे गेले असता त्यांना त्यांचे वडील मयत सुखदेव तायडे यांच्या नावे २००८ साली १८ हजारांपेक्षा जास्त पीक कर्ज घेतले, असे सेवा सहकारी सोसायटी खरब जितापूर (नाकट) यांनी रेकॉर्डला दाखविले असल्याचे आढळून आले.