कर्जमाफी: १०६४ शेतकऱ्यांना आधार क्रमांकाचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 12:01 PM2020-02-01T12:01:09+5:302020-02-01T12:01:19+5:30

१ लाख १२ हजार ६८० शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्यात आले आहेत.

Debt waiver: 1064 farmers Aadhaar number not link wit bank account | कर्जमाफी: १०६४ शेतकऱ्यांना आधार क्रमांकाचा फटका!

कर्जमाफी: १०६४ शेतकऱ्यांना आधार क्रमांकाचा फटका!

Next

- संतोष येलकर 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात थकबाकीदार १ लाख १३ हजार ८४९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, त्यापैकी १ लाख १२ हजार ६८० शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्यात आले आहेत. उर्वरित १ हजार ६४ शेतकºयांचे आधार क्रमांक अद्यापही मिळाले नसल्याने, संबंधित शेतकºयांच्या आधार क्रमांकांचा शोध घेण्याचे काम महसूल विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे.
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत गत १ एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकºयांसाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्यातील थकबाकीदार १ लाख १३ हजार ८४९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, त्यामध्ये राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँक, व्यापारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीदार शेतकºयांचा समावेश आहे. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या थकबाकीदार शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील १ लाख १३ हजार ८४९ शेतकºयांपैकी १ लाख १२ हजार ६८० शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आले असून, उर्वरित १ हजार ६४ शेतकºयांचे बँक खाते आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यासाठी संबंधित शेतकºयांचे आधार क्रमांक अद्याप संबंधित बँकांसह प्रशासनाला अद्याप मिळाले नाहीत. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या संबंधित १ हजार ६४ शेतकºयांच्या आधार क्रमांकाचा शोध घेण्याचे काम महसूल विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे.

कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांपैकी १ हजार ६ शेतकºयांचे बँक खाते आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यासाठी संबंधित शेतकºयांचे आधार क्रमांक अद्याप मिळाले नाही. त्यामुळे संबंधित शेतकºयांच्या याद्या तहसीलदारांकडे पाठविण्यात आल्या असून, तलाठ्यांमार्फत शेतकºयांचा शोध घेऊन आधार क्रमांक मिळविण्याचे काम सुरू आहे.
-संजय खडसे,
निवासी उपजिल्हाधिकारी.

Web Title: Debt waiver: 1064 farmers Aadhaar number not link wit bank account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.