कर्जमाफी : सरकारची दानत नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 02:18 AM2017-10-02T02:18:55+5:302017-10-02T02:20:46+5:30

अकोला : महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना कर्जमाफी देताना जो काही  उपद्व्याप सुरू आहे, त्यातून कर्जमाफी देण्याची सरकारची  दानत नाही. त्यांच्या विचारसरणीतच दानत, दया, करुणा, मैत्री  या भावना नाहीत, कारण या शब्दांना मनुस्मृतीमध्ये थारा नाही.  त्यामुळेच मनुस्मृतीच्या विचारांनी सत्तेवर बसलेल्यांकडून जन तेने अपेक्षा करूच नये, असे अँड. प्रकाश आंबेडकर यांनी  सांगितले. धम्मचक्र  प्रवर्तन दिनानिमित्त क्रिकेट क्लब मैदानातील  धम्ममेळाव्यात ते बोलत होते.

Debt Waiver: Not Giving Government! | कर्जमाफी : सरकारची दानत नाही!

कर्जमाफी : सरकारची दानत नाही!

googlenewsNext
ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर यांचा आरोप शेतकर्‍यांची चेष्टा करून भांडणे लावण्याचे काम

सदानंद सिरसाट । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना कर्जमाफी देताना जो काही  उपद्व्याप सुरू आहे, त्यातून कर्जमाफी देण्याची सरकारची  दानत नाही. त्यांच्या विचारसरणीतच दानत, दया, करुणा, मैत्री  या भावना नाहीत, कारण या शब्दांना मनुस्मृतीमध्ये थारा नाही.  त्यामुळेच मनुस्मृतीच्या विचारांनी सत्तेवर बसलेल्यांकडून जन तेने अपेक्षा करूच नये, असे अँड. प्रकाश आंबेडकर यांनी  सांगितले. धम्मचक्र  प्रवर्तन दिनानिमित्त क्रिकेट क्लब मैदानातील  धम्ममेळाव्यात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे  जिल्हाध्यक्ष रवींद्र दारोकार, तर मार्गदर्शक म्हणून मुंबईतील चै त्यभूमीचे व्यवस्थापक भंते बी. संघपाल यांच्यासह मान्यवर उ पस्थित होते. 
कर्जमाफीच्या निमित्ताने कधी नव्हे एवढी शेतकर्‍यांची थट्टा  करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशात तर एक पैसा कर्ज माफ  केल्याचा धनादेश देण्याचा निर्लज्जपणा सरकारने केला आहे.  सरकारची दानत नसल्याने ही कर्जमाफी देताना चेष्टा सुरू  असल्याचेही अँड. आंबेडकर म्हणाले. मनुवादी विचारसरणीत  दया, करुणा, मैत्री या भावनाच नसल्याने शेतकर्‍यांसोबत हा  प्रकार घडत आहे. मनुवादी विचारातून घडलेल्यांच्या हातात  सत्ता आहे, त्यामुळेच जनतेच्या प्रतिनिधीला राजा, मालक  संबोधण्यापर्यंत त्यांची मजल गेल्याचेही त्यांनी सांगितले. 
यावेळी मनिषा आनंदराज आंबेडकर, ऋतिका आंबेडकर,  सुजात आंबेडकर, साहिल व अमन आनंदराज आंबेडकर  यांच्यासह यावेळी भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष, बाळापूरचे  आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार हरिभाऊ भदे, वसंत  साळवे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, डी.एन. खंडारे,  पक्षाचे कार्याध्यक्ष काशिराम साबळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष  जमिरउल्लाखान पठाण, महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभा अवचार,  प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, सभापती रेखा अंभोरे, देवका पातोंड, डॉ.  डी.एम. भांडे, डॉ. हर्षवर्धन मालोकार, अशोक सोनोने, अँड.  सदानंद ब्राम्हणे, अँड. नंदेश अंबाळकर, भीमराव तायडे, युसुफ  पुंजानी,  राजू तलवारे, बालमुकुंद भिरड, हिरासिंग राठोड उपस् िथत           होते. संचालन राजाभाऊ लबडे यांनी, तर आभार  श्रावण ठोसर यांनी  मानले. 
मंचावर जिल्हा परिषदेचे गटनेता दामोदर जगताप, कोषाध्यक्ष  राजूमिया देशमुख, सुभाष रौंदळे, डॉ. प्रा. प्रसेनजित गवई,  मनोहर पंजवानी, प्रा. सुरेश पाटकर, मनोहर शेळके, वासुदेव  टिकार, धनश्री देव, बळीराम चिकटे, शे.साबीर शे.मुसा,  शंकरराव इंगळे, प्रा.शैलेश सोनोने, सुरेंद्रसिंग सोळंके,  प्रा.बिसमिल्ला खान, पंचायत समिती सभापती आशा ऐखे,  मंगला तितूर, सविता धाडसे, भीमराव पावले, आशा इंगळे, उ पसभापती सचिन झापर्डे, सूर्यकांता घनबहाद्दूर, नइमबानो शे.  मोबिन उपस्थित होत्या. 
दरवर्षी निघणार्‍या मिरवणुकीत उत्कृष्ट क्रीडा प्रकार आणि  देखावे सादर करणार्‍या मंडळांना बक्षीस देण्यात येते. गेल्यावर्षी  प्रथम बक्षीस उमरी येथील सिद्धार्थ क्रीडा मंडळाने पटकावले. द्वि तीय गोरेगाव येथील आनंद क्रीडा मंडळ, तृतीय कळंबेश्‍वर ये थील बलभीम क्रीडा मंडळाला मिळाले. या सर्व मंडळांना रोख  आणि स्मृतिचिन्ह अँड. आंबेडकर यांच्या हस्ते देण्यात आले.  सोबतच धम्म शिबिरात उत्कृष्ट कार्य करणार्‍या पंचगव्हाण ये थील संघाचा सत्कार करण्यात आला.  अधिकारी,  कर्मचार्‍यांच्या वतीने तहसीलदार राहुल तायडे यांच्या प्रयत्नातून  तयार झालेल्या आरक्षण संदर्भातील सीडीचे प्रकाशन अँड.  प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

तर पळता भुई थोडी होणार.!
भाजपचे सरकार स्वच्छ असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या  भ्रष्टाचाराचे बिंग फुटायला सुरुवात झाली, तर पळता भुई थोडी  होणार आहे. त्यांचे सरकार लुटारूंचे आहे. गुजरातच्या  निवडणुकीदरम्यान ते सर्व प्रकार पुढे येतीलच, असा सूचक  इशाराही त्यांनी दिला. काँग्रेसच्या विरोधातून लोकांनी मतदान  केले. भाजपचा भ्रष्टाचार उघड झाल्यास लोकांना तिटकारा  आल्याशिवाय राहणार नाही, एवढे निश्‍चित असल्याचे त्यांनी  सांगितले. 

आरएसएसला बहुजन संतही चालत नाहीत!
आरएसएसच्या इतिहासात कधीच त्यांनी बहुजन संतांची  विचारधारा मानली नाही. संत तुकाराम, तुकडोजी महाराज,  गाडगे महाराज यांची गावे, कार्य कर्तृत्वाकडे पाहण्याची तसदीही  त्यांनी कधी घेतली नाही. 
त्या संतांचे विचार मनुस्मृतीला आव्हान देणारे आहेत, त्यामुळेच  आरएसएस त्यांच्यापुढे कधीच नतमस्तक होत नाही. मनुवाद  प्रस्थापित करून धार्मिक, जातीय वर्चस्व निर्माण करण्यासाठी  सत्तेच्या संधीचा वापर सुरू असल्याचेही अँड. आंबेडकर यांनी  सांगितले. 

‘मेक इन इंडिया’तून आर्थिक दहशतवाद
‘मेड इन इंडिया’ नव्हे, तर ‘मेक इन इंडिया’तून परदेशी  उद्योजकांची मक्तेदारी निर्माण केली जात आहे. त्या  उद्योजकांकडून भारतीय अर्थव्यवस्था चालवण्याचे षड्यंत्र  आरएसएस, भाजपकडून सुरू आहे. भांडवल असणारे उठाव  करतात, परदेशी उद्योजकांकडेच भांडवल ठेवल्याने देशात  उठाव होणार नाही, याची तजवीज केली जात आहे. 

पेट्रोल, डीझलच्या किमतीतून लूट
मनमोहनसिंग यांच्या काळात कच्च्या तेलाचे दर १२0 डॉलर हो ते, तर भाजपच्या काळात ४९ डॉलर प्रति बॅरल आहेत. कच्च्या  तेलाचे दर प्रचंड घसरले असताना मनमोहनसिंग यांच्या काळा पेक्षाही अधिक किमतीने पेट्रोल आणि डीझलची खरेदी जनतेला  करावी लागत आहे, त्यातून जनतेची लूट सुरू आहे. जनतेच्या  खिशातून केलेल्या लुटीतून सरकार नोकरांचे पगार भागवत  असल्याचेही ते म्हणाले. 

मनुवादाला राजसत्तेचा आश्रय - अंजली आंबेडकर
गौरी लंकेशसारख्या विचारांची हत्या करणार्‍या मनुवादी  विचारसरणीला सध्याच्या राजसत्तेचा आश्रय आहे. त्यातूनच  शिक्षणक्षेत्रात प्रचंड बदल केले जात आहेत. विद्यार्थ्यांची  विचारशक्ती कुंठित करण्याची कारस्थानं सुरू आहेत. 
४गर्भसंस्काराच्या नावाखाली उद्या गोळवलकर गुरुजींचे चरित्र  शिकवले जाण्याची वेळ दूर नसल्याचेही यावेळी मार्गदर्शन कर ताना प्रा. अंजली आंबेडकर यांनी सांगितले. धर्मसत्ता, राजसत्ता,  अर्थसत्ता पहिल्यांदा एकवटली आहे. त्यातून मोठा धोका आहे.  त्याचा मुकाबला फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारानेच करता  येईल, असेही त्यांनी सांगितले. 

होय, मी नक्षलवादी आहे..!
काहींनी आपल्याला नक्षलवादी म्हटले. मनुवादी विचारसरणीचा  विरोधक म्हणून नक्षलवादी समजले जात असेल, तर मी  नक्षलवादी आहे. सरकारने पाहिजे ती कारवाई करावी, असेही  आव्हान यावेळी अँड. आंबेडकर यांनी दिले.

सरकारकडे माणुसकी नाही.!
रोहिंग्या मुस्लिमांना मदत म्हणून अन्न, औषध, तात्पुरत्या  निवार्‍याची सोय मागण्यात आली. त्याऐवजी ते भारतात  आल्यास त्यांच्यापासून धोका असल्याची आवई उठवण्यात येत  आहे. त्यांना भारतात येण्यापूर्वी ४00 किमी बांग्लादेश पार  करावा लागणार आहे. ते शक्य नाही. तरीही माणुसकीच्या ना त्याने मदत न करणारे सरकार परदेशात राहणार्‍या भारतीय  नागरिकांच्या अडचणीत वाढ करणारी भूमिका मांडत आहे,  असेही अँड. आंबेडकर यांनी नमूद केले.
-

Web Title: Debt Waiver: Not Giving Government!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.