अकोला जिल्ह्यातील महाविद्यालये उघडण्याचा निर्णय मार्चमध्ये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 11:40 AM2021-02-14T11:40:55+5:302021-02-14T11:41:06+5:30
Akola News निर्णय मार्चमध्ये घेण्यात येणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवार, १३ फेब्रुवारी रोजी दिला.
अकोला: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात महाविद्यालयांचे पूर्वीप्रमाणेच ऑनलाईन वर्ग २८ फेब्रुवारीपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर कोरोना परिस्थितीचा विचार करुन जिल्ह्यातील महाविद्यालये प्रत्यक्ष उघडण्याचा निर्णय मार्चमध्ये घेण्यात येणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवार, १३ फेब्रुवारी रोजी दिला.
शासनाच्या ३ फेब्रुवारीच्या परिपत्रकानुसार महाविद्यालयांचे नियमित वर्ग १५ फेब्रुवारीपासून सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले असून, यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने निर्णय घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने, कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यता विद्यापीठे व त्यांचेशी संलग्नित जिल्ह्यातील महाविद्यालये तसेच अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदविका महाविद्यालयांचे पूर्वीप्रमाणे ऑनलाईन वर्ग २८ फेब्रुवारपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर कोरोना विषाणू संसर्ग परिस्थितीचा विचार करुन जिल्हयातील महाविद्यालये प्रत्यक्ष उघडण्याचा निर्णय मार्चमध्ये घेण्यात येणार आहे, असा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील महाविद्यालयांचे ऑननलाईन वर्ग पूर्वीप्रमाणे २८ फेब्रुवारीपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर कोरोना परिस्थितीचा विचार करुन प्रत्यक्ष महाविद्यालये उघडण्याचा निर्णय मार्चमध्ये घेण्यात येणार आहे.
- जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी