दिसं जातीलं.. दिसं येतीलं..

By admin | Published: September 17, 2014 02:31 AM2014-09-17T02:31:48+5:302014-09-17T02:31:48+5:30

पोटच्या मुलांनी फिरवली पाठ, वृद्ध दांपत्याचा जीवनसंघर्ष.

Decision will come. | दिसं जातीलं.. दिसं येतीलं..

दिसं जातीलं.. दिसं येतीलं..

Next

राम देशपांडे / अकोला
दिवसभर पोत गाठायचे काम करून आपल्या कुटुंबाचा कसातरी उदरनिर्वाह भागविला जातो; मात्र हे करीत असताना मोठा संघर्ष करावा लागतो. हे उद्गार आहेत ४0 वर्षांपासून पोत गाठण्याचे काम करणार्‍या जव्हेरी या वृद्ध दांपत्याचे. हरिहरपेठेते राहणार्‍या या वृद्ध दांपत्याने याच व्यवसायाच्या जोरावर आपल्या मुलांना उंच उडण्याचे बळ दिले; मात्र नोकरी आणि स्वकुटुंबात रममाण झालेल्या मुलांना आई-वडिलांकडे लक्ष देण्यास आता वेळ उरलेला नाही. पुण्याला स्थायिक झालेल्या दोन्ही मुलांनी कर्तव्यापासून पाठ फिरविली असली तरी, आम्ही अद्याप हार मानलेली नसल्याचे ते सांगतात. परिणामी, उतरत्या काळात जव्हेरी दांपत्यावर आहे त्याच व्यवसायावर पोट भरण्याची पाळी आली आहे.
अकोला शहरात सराफा बाजाराव्यतिरिक्त गांधी रोडवरदेखील मोठय़ा प्रमाणात सराफा व्यावसायिकांची दुकाने आहेत. या दुकानांमधून विविध अलंकारांसह सौभाग्याच्या अलंकारांमध्ये ओवण्यासाठी सोन्या-चांदीचे मणीदेखील खरेदी केले जातात. गांधी रोडवरील शनी मंदिरासमोर पोत विणण्याचे काम करणार्‍या या वृद्ध दांपत्याकडे सौभाग्य लेणे गठविण्यासाठी अनेक जण येतात. सराफा व्यावसायिकांकडे वस्तू खरेदी करताना कुठलाही भाव न करणारे ग्राहक, पोत गाठविण्यासाठी घासाघीस करीत असल्याने अक्षरश: सकाळी दहा वाजतापासून ते सायंकाळी सा त-आठपर्यंत ५0 ते १00 रुपयांपर्यंत जेमतेम मजुरी मिळते. त्यातच पितृपक्ष सुरू असल्याने सोन्या- चांदीची खरेदीदेखील मंदावली असल्याने दैनंदिन गरजा भागविण्यासाठी कमालीची कसरत करावी लागत आहे. वृद्धत्वामुळे डोळे साथ देत नसले तरी, थरथरणार्‍या हातांना मदतीची नव्हे, तर कामाची आस असल्याचे मोठय़ा अभिमानाने जव्हेरी दांपत्य सांगतात. उतरत्या वयात आणखीनच हालाखीचे जीवन जगणार्‍या या दांपत्याला आयुष्यात एक दिवस नक्कीच सुखाचा उजाडेल, अशी आशा आहे.

Web Title: Decision will come.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.