मुकरमायकोसीसला साथ राेग जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:19 AM2021-05-21T04:19:26+5:302021-05-21T04:19:26+5:30

........... रुग्णांना औषधे उपलब्ध करून द्या अकोला : राज्य शासनाने महात्मा फुले जनकल्याण योजनेंतर्गत मुकरमायकोसिस आजाराचा समावेश करून ...

Declare rage with mucous membranes | मुकरमायकोसीसला साथ राेग जाहीर करा

मुकरमायकोसीसला साथ राेग जाहीर करा

Next

...........

रुग्णांना औषधे उपलब्ध करून द्या

अकोला : राज्य शासनाने महात्मा फुले जनकल्याण योजनेंतर्गत मुकरमायकोसिस आजाराचा समावेश करून सवलत जाहीर केली असली तरी इंजेक्शन व औषध भेटत नाही त्यामुळे नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे , त्याचे योग्य नियोजन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने करावे, अशी मागणी भाजपाच्यावतीने करण्यात आली आहे.

...........

दुर्धर आजारासाठी मदत वाटप

अकाेला : श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने फडके नगर येथील रवि कानडे या दुर्धर आजारातील रुग्णाला रामप्रसाद आर्थिक मदत देण्यात आली तसेच खरप येथील राजू जोगदंड या रुग्णाला सागर शेगोकार यांच्या हस्ते मदत देण्यात आली यावेळी संतोष पांडे विक्की ठाकूर, राम खरात,प्रवीण मानकर, गोकुळ पोतले तर फडके नगरीचे प्रशांत बानोले, संदीप वाणी नीलेश नीनोरे हे उपस्थित होते

..................

कुरणखेडयेथे रक्तदान शिबिर

अकाेला : रक्ताची कमी पडू नये, तुटवडा भासू नये म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने

कुरणखेड येथील स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, माळीपुरा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते व मोठ्या प्रमाणात तरुणांनी शिबिरात सहभाग घेतला.यावेळी अकोला जिल्हा संयोजक मनिष फाटे, मुर्तिजापूर भाग संयोजक रुपेश तलवारे, कार्यालय मंत्री व कोष प्रमुख देवाशिष गोतरकर, तंत्रशिक्षण प्रमुख आदित्य पवार, महेश वाघमारे, शाम महाजन, शुभम मुरकुटे, अभिषेक कोपुल, अकोला जिल्हा संघटन मंत्री मनोज साबळे व इतर बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.

....................

भन्तेजीना मदत वाटप

अकोला - शिवनी येथिल कपिलवस्तुनगर मध्ये प्रबुद्ध भारत बहु संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र डोंगरे यांनी भंतेजी यांना अन्नधान्याची किट व आरोग्यसाठी लागणारे औषधी गोळ्या आणि आर्थिक स्वरूपात बंद लिफाफा मध्ये दान देण्यात आले यावेळी नागेश बागडे अभिमान नितोने,चंद्रशेखर नकाशे सोनू वासनिक मिलिंद भीम कर नागेश मेश्राम. सिद्धू डोंगरे अक्षय थोरात आदी उपस्थित हाेते.

.................................

Web Title: Declare rage with mucous membranes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.