अकोलेकरांवरील मालमत्तेचा बोजा कमी करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2017 01:44 PM2017-05-20T13:44:57+5:302017-05-20T13:44:57+5:30

शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या नेतृत्वात सेनेच्या नगरसेवकांनी मनपा आयुक्त अजय लहाने यांना निवेदन सादर केले.

Decrease property burden on Akolekar! | अकोलेकरांवरील मालमत्तेचा बोजा कमी करा!

अकोलेकरांवरील मालमत्तेचा बोजा कमी करा!

googlenewsNext

अकोला : महापालिका प्रशासनाने केलेली कर वाढ अवास्तव असल्यामुळे त्यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करीत शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या नेतृत्वात सेनेच्या नगरसेवकांनी मनपा आयुक्त अजय लहाने यांना निवेदन सादर केले.
मनपा प्रशासनाने उत्पन्न वाढीच्या उद्देशातून मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केले. नागरिकांच्या घरांचे, इमारतींचे मोजमाप केले. मनपाच्या कामकाजाला विरोध नसला, तरी ज्या पद्धतीने अकोलेकरांवर कर आकारण्यात आला, तो अवाजवी असल्याची भूमिका शिवसेनेच्या वतीने घेण्यात आली आहे. मनपाने केलेली कर वाढ सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी असल्यामुळे त्यामध्ये तातडीने तोडगा काढून अकोलेकरांच्या आवाक्यात असलेला कर लागू करावा, अशी मागणी करीत शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या नेतृत्वात मनपातील गटनेता राजेश मिश्रा, नगरसेविका मंजूषा शेळके, गजानन चव्हाण, शरद तुरकर, संतोष अनासने, योगेश गीते, अश्‍विन पांडे, वनिता पागृत, सुनीता श्रीवास, रूपेश ढोरे, प्रमोद मराठे, लक्ष्मण पंजाबी, कुनाल शिंदे, दीपक पांडे, राजेश इंगळे, चेतन मारवाल, प्रकाश वानखडे, संजय अग्रवाल, मनोज बाविस्कर, शिवकुमार परिहार यांनी महापालिका आयुक्त अजय लहाने यांना निवेदन सादर केले.

Web Title: Decrease property burden on Akolekar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.