अकाेट तेल्हाऱ्यात भुजल पातळी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:18 AM2021-03-08T04:18:30+5:302021-03-08T04:18:30+5:30
अकाेला : यंदा पावसाची सरासरी ओलांडली. त्यामुळे जिल्ह्यात मार्च महिन्यात भूजलस्थिती खालावलेली नाही. मात्र, भूजलस्थिती इतकीही उत्तम नाही. ...
अकाेला : यंदा पावसाची सरासरी ओलांडली. त्यामुळे जिल्ह्यात मार्च महिन्यात भूजलस्थिती खालावलेली नाही. मात्र, भूजलस्थिती इतकीही उत्तम नाही. सद्यस्थितीत अकाेट व तेल्हारा तालुक्यात भुजल पातळी घटली असून इतर तालुक्यातील भुजल पातळी एक मिटरपेक्षाही आतच असल्याने मार्च नंतर जिल्ह्यास पाण्याची टंचाई जाणवणार आहे.
जिल्ह्यात भुजल पातळीतील घट वाढ माेजण्यासाठी भुजल सर्वेक्षण विभागाकडून ८१ निरिक्षण विहिरींची पातळी तपासली जाते यंदा जानेवारी अखेर या विहिरिंची पातळी तपासल्यानंतर अकाेट व तेल्हार तालुक्यात भुजल पातळी एक मिटरने घटल्याचे दिसून आले
गतवर्षी १२ जूनपासून पावसाला सुरुवात झाली.यावेळी चांगल्या पावसाची नोंद झाली. मान्सूनच्या परतीचा पाऊस जिल्ह्यात चांगला झाल्याने सुरुवातील भूजलात कमी व ऑक्टोबरपासून भूजलाचे पुनर्भरण झाले. त्यामुळे काही तालुक्यांत वाढ दिसून येत आहे.
अशी आहे भुजल पातळी
अकाेला - वाढ .६३ मि
अकाेट - घट १.०८ मि
बाशीटाकळी वाढ .७६ मि
बाळापूर वाढ .७८ मि
पातूर वाढ .९८ मि
मुर्तीजापूर वाढ .३४ मि
तेल्हारा घट .९२ मि
भूजलाचे व्यवस्थापन महत्त्वाचे
जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत भूजलाचा अनिर्बंध उपसा होत आहे. त्याच्या तुलनेत पुनर्भरण होत नाही. भूजलस्रोत कायम टिकविणे व पुनर्भरणात होणारी तूट भरून काढण्यासाठी कृत्रिम पुनर्भरणाच्या योजना राबविणे महत्त्वाचे आहे. याशिवाय गावोगावी नवीन बोअर व त्याद्वारे उपशावरदेखील बंधने आणणे महत्त्वाचे आहे. भूजलाच्या अमर्याद उपशावर बंधने आणणे आवश्यक आहे