डी.एड. प्रवेशाची विशेष संधी फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:18 AM2020-12-22T04:18:24+5:302020-12-22T04:18:24+5:30
विशेष फेरीमध्ये ज्या इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरला नाही, त्यांनाही ऑनलाइन अर्ज सादर करण्याची संधी मिळाली आहे. विद्यार्थ्यांना पसंतीच्या ...
विशेष फेरीमध्ये ज्या इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरला नाही, त्यांनाही ऑनलाइन अर्ज सादर करण्याची संधी मिळाली आहे. विद्यार्थ्यांना पसंतीच्या काॅलेजमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण आहेत किंवा मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५ टक्के गुण प्राप्त केले असतील ते विद्यार्थी डी.एड. प्रवेशासाठी विशेष फेरीमध्ये अर्ज करू शकणार आहेत.
अशी आहे जिल्ह्यातील स्थिती
अकोला जिल्ह्यात २०११-१२ पर्यंत एकूण १९ डी.एड. काॅलेज सुरू होती. मात्र, त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ५ कॉलेज बंद करण्यात आली, तर प्रवेशसंख्या कमी झाल्याने ६ काॅलेज बंद झाली आहेत. त्यापैकी सद्यस्थितीत ८ कॉलेज सुरू असून, यामध्ये ०३ काॅलेज उर्दू माध्यमाची व ५ काॅलेज मराठी माध्यमाची आहेत. डी.एड. प्रवेशाकरिता आठपैकी दोन कॉलेजमध्ये शासकीय कोट्यातील प्रवेश पूर्ण भरले गेले असून, बाकी कॉलेजमध्ये थोड्याच जागा शिल्लक असल्याची माहिती आहे. मराठी माध्यमाच्या शासकीय कोट्यातील एकूण २०० जागा आहेत. त्यापैकी केवळ ७५ जागाच रिक्त आहेत.
काेट
शासनाने गेल्या वर्षी पवित्र पाेर्टलच्या माध्यमाततून सहा हजार शिक्षकांची भरती करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे डी.एड.कडे विद्यार्थ्यांचा कल वाढला असून, काेराेनाच्या काळात ऑनलाइनच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विजय अग्रवाल प्राचार्य