जिल्हा व सत्र न्यायालय येथील ‘ई-सेवा’ केंद्राचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:21 AM2021-08-23T04:21:47+5:302021-08-23T04:21:47+5:30

जिल्हा व सत्र न्यायालय येथील ‘ई-सेवा’ केंद्राचे लोकार्पण जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत ...

Dedication of ‘E-Service’ Center at District and Sessions Court | जिल्हा व सत्र न्यायालय येथील ‘ई-सेवा’ केंद्राचे लोकार्पण

जिल्हा व सत्र न्यायालय येथील ‘ई-सेवा’ केंद्राचे लोकार्पण

Next

जिल्हा व सत्र न्यायालय येथील ‘ई-सेवा’ केंद्राचे लोकार्पण जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यनशिवराज खोब्रागडे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य ॲड. मो. घ. मोहता, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राजेश जाधव व जिल्हा संगणक प्रणाली समन्वयक तथा जिल्हा न्यायाधीश-३ दिलीप पतंगे, न्यायिक अधिकारी व विधिज्ञ, आदी उपस्थित होते.

यावेळी पालक न्यायमूर्ती अनिल किलोर म्हणाले की, न्यायदानाचे काम हे सामाजिक सेवा असून, शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय मिळाला पाहिजे. ई-सेवा प्रणालीद्वारे न्यायालयीन कामकाज अधिक सोपे व सोईस्कर होणार आहे. या प्रणालीचा लाभ वकील व पक्षकारांनी घेऊन वेळ व पैशाची बचत करावी. जिल्ह्यातील केसची पेडन्सी कमी करण्यासाठी न्यायाधीशांसह वकिलांनी प्रयत्न करण्याचे आवाहन न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. के. खाडे यांनी, तर जिल्हा न्यायाधीश-३ दिलीप पतंगे यांनी आभार मानले.

Web Title: Dedication of ‘E-Service’ Center at District and Sessions Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.