जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते दिपक सदाफळे सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:23 AM2021-08-14T04:23:38+5:302021-08-14T04:23:38+5:30

यावेळी इं.रे.क्राॅ. शाखा अकोलाचे सचिव प्रभजीत सिंह बछेर, उपाध्यक्ष अमर गौड, कोषाध्यक्ष ॲड.महेंद्र साहू, कार्यकारी सदस्य ॲड.सुभाषसिंग ठाकूर, अरुंधती ...

Deepak Sadaphale honored by the Collector | जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते दिपक सदाफळे सन्मानित

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते दिपक सदाफळे सन्मानित

Next

यावेळी इं.रे.क्राॅ. शाखा अकोलाचे सचिव प्रभजीत सिंह बछेर, उपाध्यक्ष अमर गौड, कोषाध्यक्ष ॲड.महेंद्र साहू, कार्यकारी सदस्य ॲड.सुभाषसिंग ठाकूर, अरुंधती शिरसाट, प्रशांत राठी, मानद व्यवस्थापक मोहन काजले उपस्थित होते.

--------------------

क्षुल्लक कारणावरून एकास मारहाण

उरळ : उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या हातरुण येथे दि. १० ऑगस्ट रोजी रात्री ११ च्या सुमारास वाद होऊन एक जण जखमी झाल्याची घटना घडली.

हातरुण येथे फिर्यादी अमोल खरप घरासमोर उभे असताना त्यांनी आरोपी अनंता सोनोने व त्यांचा मुलगा गोलू याला म्हटले की, तुम्ही माझ्या कुत्र्याला का मारता? या क्षुल्लक कारणावरून आरोपींनी संगनमत करून अमोल खरप यास चाकू मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत एक जण जखमी झाला. त्याला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. खरप यांनी दि. ११ ऑगस्ट रोजी उरळ पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार अनंत वडतकर यांच्या मार्गदर्शनात जमादार विजय झाकर्डे, रघुनाथ नेमाडे, संतोष भोजने तपास करीत आहेत.

------------------

पुलावरुन दुचाकी कोसळली; दोन गंभीर

बाळापूर : हैदाबाद-इंदौर महामार्गावरील वघाडी नाल्याला कठडे नसल्याने दुचाकी पुलाखाली कोसळली. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले.

वाडेगावहून बाळापूरमार्गे दुचाकी नंबर (एमएच ३० क्यू ७१४५) ने जात असताना वामनराव रावणकर (५५), सचिन हिपकर हे दोन्ही काकनवाडा (ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा) महामार्गावरील वघाडी नाल्यावर पुलाला कठडे नसल्याने रात्री ८ वाजता पुलावरुन खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाले. दोघांना जिल्हा सर्वसामान्य रुग्णालयात दाखल केले.

--------------

‘त्या’ आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर

अकोट : येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी दिपा उर्फ रेशमा आझाद खान हिचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे. अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीचा अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करणे आदी विविध गुन्ह्यात आरोपी ऊर्फ रेशमा आझाद खान हिचा सहभाग आहे. या प्रकरणी आरोपी अटक असून कारागृहात आहे. दरम्यान जामीन मिळावा, याकरिता अर्ज न्यायालयात दाखल केला होता. दरम्यान, न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी जामीन नाकारला. आरोपीला जामीन देण्यात येऊ नये, यावर सरकारी वकील अजित देशमुख यांनी युक्तिवाद केला.

-------------

आगामी सण, उत्सव शांततेत साजरे करावे

पिंजर : पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार पाली यांच्या मार्गदर्शनाखाली बिट इंन्चार्ज राजू वानखडे यांनी बैठक घेऊन सर्व ग्रामस्थांना आगामी सण उत्सव कोरोना, व कायदा व सुव्यवस्था राखून साजरे करावे, असे आवाहन केले. बैठकीत अभिजित सिरसाट, श्रीकांत आचल, सांडे आदी उपस्थित होते.

Web Title: Deepak Sadaphale honored by the Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.