भूखंड घोटाळय़ातील मुख्य आरोपी दीपक झांबडला १४ दिवसांचा ‘एमसीआर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 01:29 AM2018-01-02T01:29:14+5:302018-01-02T01:29:58+5:30

अकोला : शासनाच्या मालकीच्या २0 कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळय़ातील मुख्य आरोपी दीपक झांबडची सोमवारी पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, तर दीपक झांबडचे पिता रमेश झांबड यांची प्रकृती खालावल्याने त्यांना काही दिवसांसाठी आजारी रजा कारणाने अंतरिम जामीन देण्यात आला आहे.

Deepak Zambadal, the main accused in the plot scam, is in the 14-day 'MCR' | भूखंड घोटाळय़ातील मुख्य आरोपी दीपक झांबडला १४ दिवसांचा ‘एमसीआर’

भूखंड घोटाळय़ातील मुख्य आरोपी दीपक झांबडला १४ दिवसांचा ‘एमसीआर’

googlenewsNext
ठळक मुद्देरमेश झांबड यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अंतरिम जामीन

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासनाच्या मालकीच्या २0 कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळय़ातील मुख्य आरोपी दीपक झांबडची सोमवारी पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, तर दीपक झांबडचे पिता रमेश झांबड यांची प्रकृती खालावल्याने त्यांना काही दिवसांसाठी आजारी रजा कारणाने अंतरिम जामीन देण्यात आला आहे.
अकोला शहरातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शिट नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिरानजीकचे भूखंड शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/ ‘पैकी’ असा शब्दप्रयोग करून तब्बल २0 कोटी रुपये किमतीच्या ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर भूखंडाचे हस्तलिखित दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या संगनमताने गजराज गुदडमल मारवाडी यांच्या नावे संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन हा भूखंड कागदोपत्री हडपून घोटाळा करण्यात आला होता. हे प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले व पाठपुरावा केल्यानंतर याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दीपक रमेश झांबड व रमेश गजराज झांबड यांच्यासह भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. झांबड पिता-पुत्राचा जिल्हा व सत्र न्यायालय तसेच उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर दोघेही फरार झाले होते; मात्र आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख गणेश अणे यांनी २३ डिसेंबर २0१७ रोजी दीपक झांबड व रमेश झांबड या दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयाने सात दिवसांची व नंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 
सोमवारी दीपक झांबडची पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, त्यानंतर झांबड यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज सादर केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Web Title: Deepak Zambadal, the main accused in the plot scam, is in the 14-day 'MCR'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.