आदिवासींच्या कृषिक्रांतीतील दीपशिखा ‘नासरी’

By admin | Published: October 10, 2016 02:55 AM2016-10-10T02:55:07+5:302016-10-10T02:55:07+5:30

नासरीने गावातील शाळा आणि शाळाबाह्य मुलांसाठी मोफत शिकवणी वर्ग.

Deepshikha 'Nashari' in Tribal Agriculture | आदिवासींच्या कृषिक्रांतीतील दीपशिखा ‘नासरी’

आदिवासींच्या कृषिक्रांतीतील दीपशिखा ‘नासरी’

Next

नीलिमा शिंगणे -जगड
अकोला, दि. 0९- तंत्रज्ञानाने जगाचा उंबरठा ओलांडला अन् यातूनच विकास प्रक्रियेचा वेगही वाढला. मात्र, आपल्या देशातील एक वर्ग आजही या प्रगतीचा विचार आणि झगमगाटापासून कोसोदूर आहे. अकोला जिल्ह्यातील आकोट आणि तेल्हारा तालुक्यातील बराचसा भाग सातपुड्याच्या पर्वतरांगांनी व्यापलेला. येथील आदिवासींचे जीवन, शेतीपद्धती आणि चालीरीती-परंपराही अगदी त्यांच्या संस्कृतीशी नातं सांगणार्‍या. त्यामुळेच, अलीकडे कृषी क्षेत्रातील बदलांची ह्यचाहूलह्ण या शेतकर्‍यांच्या बांधावर पोहोचलीच नाही. मात्र, अलीकडे या भागातील आदिवासी, त्यांची शेती अन् शेती-पद्धती ह्यकूसह्ण बदलू पाहते. या सकारात्मक बदलांची जन्मदात्री आहे, याच आदिवासी समाजातील एक २७ वर्षाची तरुणी. नासरी शेकड्या चव्हाण असं या तरुणीचं नाव.
तेल्हारा तालुक्यातील बोरव्हा हे सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेलं तिचं गाव. या गावात झालेल्या कृषी समृद्धी प्रकल्पांतर्गत ह्यसर्ग विकास समितीह्णच्या एका शेतीशाळेने गावात परिवर्तनाचे बीज रोवले. अन् गावातील शेतकर्‍यांनी रासायनिक खत आणि कीटकनाशकांना कायमची मूठमाती देण्याचा विडा उचलला. गावातच ह्यकंपोस्ट खतह्ण, ह्यएस. ९ कल्चरह्ण आणि सेंद्रिय कीटकनाशक असणार्‍या ह्यतरल खादह्णची निर्मिती सुरू झाली. पण, गावाला या नवविचार आणि कृषी क्षेत्रातील नव्या बदलांना सामोरे जाण्याची प्रेरणा देणारी होती, त्यांच्याच गावातील अन् त्यांच्यातीलच एक असणारी नासरी.
ह्यबायोडायनामिक कंपोस्ट खतह्ण आणि फवारणीसाठी लागणारे सेंद्रिय ह्यबायो डायनामिक तरल खादह्ण कसे तयार करायचे, याचे शास्त्रशुद्ध धडे तिने गावकर्‍यांना दिले. नासरीने कृषी विभाग, कृषी विद्यापीठाच्या साथीने आता या भागात जलसंधारणाचे नवीन प्रयोग राबवायला सुरुवात केली. उताराला आडवी पेरणी करण्याचे ह्यमिशनह्ण आता तिने हाती घेतले. त्यामुळे या भागातील जवळपास ४0 टक्के भागावर गेल्या वर्षीपासून उतरला आडवी पेरणी होत आहे. त्यातून जमिनीत पाणी मुरण्याची आणि जिरण्याची प्रक्रिया अधिक गतिमान झाल्याने, डोंगर उतारावरच्या शेतीतील उत्पादनही वाढले आहे. नासरीच्या गावाबाजूच्या पिंपरखेड, धोंडा आखर, भिली, चिपी, भिली या गावांतील शेतकर्‍यांनी आता आपल्याच गावांत ह्यबायोडायनामिक कंपोस्टह्ण, ह्यएस.९ कल्चरह्ण आणि ह्यतरल खादह्ण तयार करायला सुरुवात केली.
नासरीने आता गावात गर्भवती महिलांना सकस आहाराविषयी जागृत करण्यास सुरुवात केलीे. यासोबतच गरोदरपणात घ्यायची काळजीविषयी माहिती देत, ती दारोदारी जात महिलांना जागृत करीत आहे. गावातील कुपोषणाचा प्रश्न लक्षात घेत तिच्या पुढाकाराने गावातील गरजू लाभार्थींना कोंबड्या आणि बकर्‍या शासकीय योजनेतून मिळवून दिल्या.
नासरीच्या बोरव्हा गावात जिल्हा परिषदेची पाचवीपयर्ंत शिक्षण देणारी प्राथमिक शाळा आहे. मात्र, काही दिवसांपयर्ंत ही शाळा विद्यार्थ्यांविना ओस पडलेली असायची. परिस्थिती आणि शिक्षणाच्या महत्त्वाची जाणीव नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडलेले. या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नासरीने आता कंबर कसली आहे. यासाठीच्या प्रसार ताकदीने व्हावा म्हणून नासरीने गावातील शाळा आणि शाळाबाह्य मुलांसाठी मोफत शिकवणी वर्ग सुरू केला. यामध्ये शिक्षणासोबतच तिने याचे महत्त्व तिच्या बोली भाषेतून समजावून सांगायला सुरुवात केलीे. त्यामुळेच आता गावांतील शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. यामध्ये शाळाबाह्य असलेल्या मुलांनी शाळेत प्रवेश घेण्याचे प्रमाणही मोठय़ा प्रमाणात वाढले.
नासरीच्या घरातील पाच बहिणी आणि दोन भावांच्या परिवारात चौथ्या क्रमांकाची मुलगी म्हणजे नासरी. गावात ना घरात शिक्षणाचे वातावरण. मात्र, आपल्या गावात असलेल्या प्राथमिक शाळेत नासरीने चौथीपयर्ंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढच्या शिक्षणासाठी गावापासून सहा किलोमीटर अंतरावर असणार्‍या शाळेपयर्ंत नासरी पायपीट करीत होती. बारावीपयर्ंत नेटाने आपले शिक्षण तिने सर्व विरोध मोडून काढत पूर्ण केले. मात्र, पुढे परिस्थितीमुळे शिक्षण थांबवावे लागल्याने आता अलीकडे तिने मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. अलीकडेच कृषी विद्यापीठात झालेल्या ह्यआंतरराष्ट्रीय शेतकरी परिषदेह्णत तिने सहभाग घेऊन आपले अनुभव विशद केले. तिच्या कार्यामुळे भारावलेल्या श्रीलंका, इटली, नेदरलँड, केनियातील शेतकरी आणि तज्ज्ञांनी तिला आता आपल्या देशातील शेतकर्‍यांना तिने केलेल्या प्रयोगांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी पाचारण केले. याकरिता सध्या नासरी इंग्रजी संभाषण व व्यक्तिमत्त्व विकासाचे एक महिना कालावधीचे प्रशिक्षण घेण्यासाठी गावातील सर्व कामे सांभाळून अकोल्यात ये-जा करते. तिच्या प्रयोगाच्या प्रसारासाठी तिने अकोला जिल्ह्याबरोबरच वर्धा, यवतमाळ, वाशिम आणि बुलडाणा या जिल्ह्यांमधील शेतकर्‍यांमध्ये जागृतीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

Web Title: Deepshikha 'Nashari' in Tribal Agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.