इंस्टाग्रामवर तरूणीची बदनामी, पाेलिसांत गुन्हा; बनावट आयडीद्वारे तरूणीचा ठेवला फोटो
By आशीष गावंडे | Updated: June 15, 2024 19:42 IST2024-06-15T19:42:16+5:302024-06-15T19:42:27+5:30
शहरातील अज्ञात आरोपीने फिर्यादीच्या १९ वर्षीय मुलीच्या नावाने सोशल मिडियावरील इंस्टाग्रामवर तरूणीच्या परवानगी शिवाय बनावट आयडी तयार केला.

इंस्टाग्रामवर तरूणीची बदनामी, पाेलिसांत गुन्हा; बनावट आयडीद्वारे तरूणीचा ठेवला फोटो
अकोला: शहरातील खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका १९ वर्षीय तरूणीची इंस्टाग्रामवर बनावट आयडी तयार करून तिचा फोटो ठेवत अज्ञात आरोपीने तरूणीची बदनामी करण्याचा प्रयत्न १३ जून रोजी उघडकीस आला आहे. या प्रकरणी १६ जून रोजी खदान पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील अज्ञात आरोपीने फिर्यादीच्या १९ वर्षीय मुलीच्या नावाने सोशल मिडियावरील इंस्टाग्रामवर तरूणीच्या परवानगी शिवाय बनावट आयडी तयार केला. त्यामध्ये फिर्यादीच्या मुलीचा प्रोफाइल फोटो ठेऊन मुलीच्या मैत्रिणीला फोटो आणि मेसेज पाठवून बदनामी करण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकार १३ जून रोजी समोर आला आहे. त्यानुसार खदान पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ६६ (सी) आयटीअॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास खदान पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गजानन धंदर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिनस्त पोलिस अधिकारी, अंमलदार करीत आहेत.