तडीपार असलेल्या आरोपीस शस्त्रासह अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 16:10 IST2021-12-18T16:10:16+5:302021-12-18T16:10:45+5:30
Crime News : निलेश प्रभाकर थोप (३०) हा गावात धारदार शस्त्र घेऊन फिरत असताना ग्रामीण पोलीसांनी त्याला शनिवारी ताब्यात घेतले.

तडीपार असलेल्या आरोपीस शस्त्रासह अटक
मूर्तिजापूर : ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम खरब ढोरे येथील तडीपार असलेला आरोपी निलेश प्रभाकर थोप (३०) हा गावात धारदार शस्त्र घेऊन फिरत असताना ग्रामीण पोलीसांनी त्याला शनिवारी ताब्यात घेतले.
अनेक गंभीर गुन्हे असलेला आरोपी निलेश प्रभाकर थोप (३०) याला उपविभागीय अधिकारी अभयसींह मोहिते यांच्या आदेशानुसार सप्टेंबर महिन्यात ६ महिन्याच्या किलावधीसाठी अकोला, वाशीम, अमरावती या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. परंतु तो अनेक दिवसांपासून गावाच असल्याची गुप्त माहिती ग्रामीण पोलीसांना मिळाली शनिवारी तो गावात हातात (कत्ता) धारदार शस्त्र घेऊन फिरत असताना पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. आरोपी विरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम १४२, ४२५ आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सदर कारवाई ठाणेदार गोविंद पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सत्यजित मानकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल गोलंदास लांजेवार यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने केली.